शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी शहर हादरून गेलं होतं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:20 IST

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा मी अवघ्या आठ वर्षांचा होतो. स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वसंध्येला सर्वत्र बॉम्बचा वर्षाव सुरू होता. याचे आवाज सतत कानावर पडत होते. अखेर १५ आॅगस्ट हा दिवस उजाडला अन् भारत पारतंत्र्यातून मुक्त झाला. सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. साताऱ्यात ठिकठिकाणी तिरंगा फडकू लागला. मी ही ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा मी अवघ्या आठ वर्षांचा होतो. स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वसंध्येला सर्वत्र बॉम्बचा वर्षाव सुरू होता. याचे आवाज सतत कानावर पडत होते. अखेर १५ आॅगस्ट हा दिवस उजाडला अन् भारत पारतंत्र्यातून मुक्त झाला. सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. साताऱ्यात ठिकठिकाणी तिरंगा फडकू लागला. मी ही मोठ्या अभिमानाने ध्वजारोहणाला हजेरी लावली अन् यानंतर खºया अर्थाने माझ्या मनात देशसेवेचे बीज रोवले गेले,’ हे वाक्य आहेत माजी सैनिक हारुण मोहंमद मेमन यांचे.हारुण मेमन हे साताºयातील सदर बझार येथे वास्तव्य करीत आहेत. त्यांचा जन्म २५ जानेवारी १९४० रोजी साताºयात झाला. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने मेमन यांच्या मनातही देशसेवेची भावना निर्माण झाली. शिक्षण घेत असतानाच वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी ते १९५४ रोजी आर्मीच्या बॉम्बे इंजिनियर ग्रुपमध्ये दाखल झाले अन् त्यांचे देशसेवेचे स्वप्न साकार झाले.हारुण मेमन यांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळातील काही अनुभव ‘लोकमत’पुढे व्यक्त केले. ते म्हणाले, ‘१५ आॅगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा मी अवघ्या आठ वर्षांचा होतो. मी शाळेत जात होतो. भारत स्वातंत्र्य व्हावा, यासाठी सर्वत्र आंदोलने सुरू होती. इंग्रजांविरोधात सर्वत्र बंड पुकारण्यात आले होते. साताºयातही अशीच काहीशी परिस्थिती होती. अखेर असंख्य भारतीयांपुढे ब्रिटिशांना नमते घ्यावे लागले अन् भारत पारतंत्र्यांतून मुक्त झाला. मला आजही तो दिवस वरचेवर आठवत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वसंध्येला साताºयात बॉम्ब फुटल्यासारखे आवाज येत होते. मनामध्ये भीतीचे काहूर माजले होते. सर्वत्र धावपळ सुरू होती. ती रात्र कशीबशी गेली अन् तो दिवस अखेर उजाडला.रेडिओवरून भारत स्वातंत्र्य झाल्याचे वृत्त कानी पडले. सर्वत्र ही बातमी वाºयासारखी पसरली. गल्लीबोळात आनंदोत्सव साजरा केला जाऊ लागला. अनेकांच्या हातात राष्ट्रध्वज अभिमानाने फडकत होता. शहरात एका ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यासाठी माझ्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.भारत-पाकिस्तान युद्धात सहभागहारुण मेमन हे देशसेवा बजावत असताना पुणे, आसाम, इलाहाबाद श्रीनगर आदी ठिकाणी त्यांनी काम केले. तसेच भारत व पाकिस्तान युद्धातही त्यांचा सहभाग घेतला होता. या युद्धात पाकिस्तानला दोनदा भारताने नमवले होते. आपल्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना सेना मेडल, रक्षा मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे.