शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची ताकद वाढवा: शिवतारे

By admin | Updated: July 10, 2015 22:15 IST

निवडणुका लढवा : निमसोड येथील बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना

वडूज : ‘आगामी काळात होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या माध्यमातून खटाव-माण तालुक्यांत शिवसेनेची ताकद वाढवा,’ असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केले.निमसोड, ता. खटाव येथे हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुुख नंदकुमार घाडगे, ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे, वसंतराव गोसावी, सुरेशशेठ शिंदे, रणधीर जाधव, गोविंदराव शिंदे, संभाजी फडतरे, राजूभाई मुलाणी, डॉ. संतोष गोडसे, विकास जाधव, शाहिस्तेखान मुलाणी, मनोहर लावंड, सी. बी. पवार, रामभाऊ घार्गे, गुलाबराव वाघ, वसंतराव गोसावी, संजयशेठ शितोळे, संभाजी पाटील, सी. के. आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.शिवतारे म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत खटाव तालुक्यात शिवसेनेची चांगली ताकद दिसून आली. विधानसभेप्रमाणेच बाजार समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सर्व प्रमुख कार्यकर्ते एकदिलाने सामोरे गेले तर या ठिकाणी निश्चितपणे परिवर्तन होणार आहे. माणमध्ये संघटनेची बांधणी करण्यासाठी लक्ष घालावे लागणार आहे. दोन्ही तालुक्यांतील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी रणजितसिंह देशमुख यांचे नेतृत्व चांगले आहे. यापुढच्या काळातही त्यांच्या नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी शिवसेना व शासनाच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल. दोन्ही तालुक्यांतील शिवसैनिकांनी जुना-नवा, असा भेदभाव न ठेवता देशमुखांच्या नेतृत्वाखाली संघटनेची चांगली बांधणी करावी.’रणजितसिंह देशमुुख यांनी दोन्ही तालुक्यांतील विकासकामे व वैयक्तिक अडीअडचणीबाबत पालकमंत्र्यांना निवेदन दिले.या बैठकीस धर्मराज जगदाळे, लक्ष्मण शिंगाडे, मुबारक मुल्ला, विजय शिंदे, शहाजी देशमुख, किसनराव सानप, विकास साबळे, अंकुशराव घाडगे, परेश जाधव, प्राचार्य आर. एन. घाडगे, शिवाजीराव देशमुख, अ‍ॅड. सुभाषराव देशमुख, अ‍ॅड. अजित घाडगे, हिम्मत जगदाळे, सुनील फडतरे, दादासाहेब कदम-पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)