शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

‘खाण्या’त वाढतोय महिलांचाही टक्का !

By admin | Updated: June 13, 2015 23:57 IST

प्रशासनाला कीड भ्रष्टाचाराची : चार वर्षांमध्ये सहा महिलांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

सातारा : भ्रष्टाचार नाही, असा कोणताच विभाग आपल्याला पाहायला मिळणे सध्यातरी शक्य नाही. खासगी असो किंवा शासकीय यंत्रणा. त्यामध्ये चिरीमिरी घेऊन मलिदा लाटणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. पूर्वी केवळ पुरुषच लाच घेतात, असा एक गैरसमज समाजात पसरला होता; परंतु आता महिलाही लाच घेण्यामध्ये काही मागे राहिल्या नाहीत, हेही अलीकडच्या काही वाढत्या घटनांमधून स्पष्ट झाले आहे. महिलांच्या विरोधात तक्रार देण्याचे प्रमाण पूर्वी अत्यल्प होते; परंतु सध्या समाज सजग झाल्याने महिलांच्या विरोधात तक्रारींचा ओघ वाढला असल्याचे लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. लाचलुचपतच्या जाळ्यात आत्तापर्यंत शंभरहून अधिकजण अडकले आहेत. खासगी व्यक्तींपासून शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच आपले हात काळ्या पैशाने बरबटून टाकले आहेत. अशा लोकांच्या हातात एसीबीने बेड्याही ठोकल्याचे सगळ्यांनाच महिती आहे. परंतु अशा प्रकारच्या कारवायांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त का? केवळ पुरुषच लाच घेतात, असा प्रश्न उपस्थितीत केला जात होता. आता सर्वच ठिकाणी महिला काम करत असताना मग लाच घेण्यामध्ये महिलांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात. दहा-बारा वर्षांपूर्वीचा काळ पाहिला तर एकही महिला लाच घेताना सापडली नाही, याची कारणे अनेक आहेत. महिला लाच घेताना सापडल्या नाहीत. म्हणजे, महिला भ्रष्टाचारच करत नाहीत, असा अर्थ होत नाही; परंतु पुरुष ज्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीशी पैशाची मागणी करतो. त्या पद्धतीने कोणतीही महिला करत नाही. म्हणजे, दमदाटी, आरेरावीची भाषा, हेलपाटे मारायला लावणे, असे प्रकार पुरुषांकडून केले जातात. महिलांही यामध्ये काही कमी नाहीत; परंतु त्या आपली प्रतिष्ठा आणि नोकरी सांभाळण्यासाठी प्रयत्नशील राहतात. बोटावर मोजण्याइतपतच महिला भ्रष्टाचारामध्ये धडाडीने सामील झाल्याच्या पाहायला मिळतात. (प्रतिनिधी)