शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वाढलेला टक्का कोणाच्या पारड्यात जाणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 23:54 IST

अजित जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात मंगळवारी लोकसभेसाठी उत्साहपूर्ण वातावरणात मतदान झाले. राष्ट्रवादी व शिवसेनेसह ...

अजित जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कमहाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात मंगळवारी लोकसभेसाठी उत्साहपूर्ण वातावरणात मतदान झाले. राष्ट्रवादी व शिवसेनेसह सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. वाई विधानसभा मतदार संघासाठी महाबळेश्वर तालुक्यातून टक्का वाढला असला तरी तो उदनयराजे भोसले की नरेंद्र पाटील या दोघांपैकी कोणच्या पारड्यात जाणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.महाबळेश्वर तालुक्यात सलग दहा वर्षेे राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे उदयनराजे भोसले यांना मानणारा वर्गही येथे मोठ्या प्रमाणात होता. परिणामी महाबळेश्वर तालुक्यातून उदयनराजे यांना सलग दोन वेळा चांगले मताधिक्य मिळाले. परंतु गत विधानसभेच्या निवडणुकीवेळी महाबळेश्वर तालुक्यातील काँग्रेसचे नेते व नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे महाबळेश्वर तालुक्यात कॉँग्रेस बॅकफूटवर गेली तर शिवसेनेला उभारी मिळाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे कुमार शिंदे यांनी पालिकेची निवडणूक झाल्यावर भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दोन दिग्गज कार्यकर्त्यांनी पक्षांतर केल्याने शहरात राष्ट्रवादीची पिढेहाट झाली. मात्र, ग्रामीण भागात बाळासाहेब भिलारे, राजेंद्र राजापुरे यांनी राष्ट्रवादीकडे सत्ता कायम ठेवली आहे.असे असले तरी लोकसभेची रणधुमाळी सुरू झाल्यापासून दोन्ही उमेदवारांनी सभा, बैठका व गाठीभेटी घेऊन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. महाबळेश्वर शहरात जरी कॉँग्रेस व राष्ट्रवादी बळकट नसली तरी उदयनराजेंना मानणारा वर्ग मोठा आहे. तर दुसरीकडे नरेंद्र पाटील यांच्यासाठी सेना व भाजप कार्यकर्त्यांनी झटून काम केले आहे. जिल्ह्यात वाई मतदार संघासाठी महाबळेश्वर तालुक्यातून चांगले मतदान झाले आहे. मतदारराजाने आपला कौल मतदानाच्या रुपात दिला आहे. परंतु हा कौल युती कि आघाडी या पैकी कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहविधानसभेत जागा कोणाच्या वाट्यालाविधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे वाई मतदारसंघातून मकरंद पाटील पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, भाजप-शिवसेने युतीतर्फे ही जागा शिवनेतेच्या कोट्यात आहे. विधानसभेत जाण्यास उत्सूक असलेल्या मदन भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी तयारीही सुरू केली मात्र, जागा वाटपामध्ये महायुतीकडून ही जागा नेमकी कोणाला जाणार याकडे लक्ष लागले आहे.‘आमचं ठरलंय’चीच चर्चा अधिकशिवसेनेचा व भाजपचा प्रचार ‘ना प्रचार ना बुथ आमचं ठरलंय,’ अशा पद्धतीने सुरू होता. काही ठिकाणी धनुष्यबाण तर मिशावर हात फिरवून ‘आमचं ठरलंय’ असंही तरुण पिढी सांगत होती. परंतु महाबळेश्वर तालुक्याचे राजकारण भल्याभल्यांना समजले नाही, यामध्ये कोण जिंकेल कोण हरेल, हे मात्र २३ मे रोजी कळेल, अशी परिस्थिती आहे.