शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेच्या पाणीसाठ्यात एक टीएमसीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:47 IST

सातारा : जिल्ह्यात तीन दिवसांपासून चांगला पाऊस होत असून, पश्चिम भागातील नवजा येथे सर्वाधिक ७९ मिलिमीटरची नोंद झाली, तर ...

सातारा : जिल्ह्यात तीन दिवसांपासून चांगला पाऊस होत असून, पश्चिम भागातील नवजा येथे सर्वाधिक ७९ मिलिमीटरची नोंद झाली, तर महाबळेश्वरला ४१ व कोयनानगर येथे ५४ मिलिमीटर पाऊस झाला. कोयना धरणात २४ तासांत जवळपास एक टीएमसीने वाढ होऊन साठा ९६.११ टीएमसीवर पोहोचला. दरम्यान, पूर्व दुष्काळी भागातही अनेक ठिकाणी चांगला पाऊस होत आहे.

जिल्ह्यात जुलै महिन्याच्या मध्यावर जोरदार पाऊस झाला होता. त्यावेळी पश्चिम भागात तर धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. रस्ते वाहून गेले होते. तसेच जमिनी तुटल्या होत्या, तर अवघ्या तीन दिवसांत कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला विक्रमी पाऊस झाला होता. त्याचबरोबर कोयना धरणात इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. मात्र, ऑगस्ट महिन्यात एकदम कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे धरणे पूर्णपणे भरलीच नाहीत. तर पूर्वेकडील खरीप हंगामातील पिके पावसाअभावी वाळू लागली होती. त्यामुळे धरणे भरणार का? अशी चिंता लागली होती. पण, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. अनेक ठिकाणी दमदार पाऊस होत आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे ५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली; तर जून महिन्यापासून ३७६८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. महाबळेश्वरला आतापर्यंत ५०२०, तर नवजाला ५०७३ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

दरम्यान, पूर्व भागातील माण, खटाव आणि फलटण या तालुक्यांतही अनेक ठिकाणी चांगला पाऊस होऊ लागला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

चौकट :

प्रमुख धरणांत समाधानकारक साठा...

जिल्ह्याच्या पश्चिम भागात प्रमुख आणि मोठी धरणे आहेत. या धरण परिसरत पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे धरणांत समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. कोयना धरणात ९६.११ टीएमसी साठा असून, टक्केवारी ९१ च्यावर गेली आहे. धोम धरणात ८८, कण्हेरमध्ये ९०, उरमोडी धरणात ८३, बलकवडी ९६ आणि तारळी धरणात ९१ टीएमसीच्या आसपास पाणीसाठा झाला आहे.

............................................................