कऱ्हाड : लायन्स क्लब ऑफ कऱ्हाडने गोरगरिबांना लवकर उपचार होण्यास मदत होण्यासाठी लायन्स आय हॉस्पिटल संचलित लायन्स होमिओपॅथी धर्मादाय क्लिनिकचा शुभारंभ १५ ऑगस्ट रोजी करण्यात आला. या वेळी लायन्स क्लब कऱ्हाडचे अध्यक्ष खंडू इंगळे, लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. सतीश शिंदे, लायन्स क्लब कऱ्हाड नक्षत्रच्या अध्यक्षा गौरी चव्हाण, डॉ. धनंजय खैर आदी उपस्थित होते.
खंडू इंगळे म्हणाले, “दोनशे वर्षांपासून सुरू असलेल्या या पॅथीमुळे अनेक रुग्णांना फायदा झाला आहे. कोणताही साईट इफेक्ट न होता ही औषधे काम करतात. त्यामुळे जनरल व अनेक जुनाट आजार असलेल्या गोरगरीब रुग्णांना येथील धर्मादाय क्लिनिकमध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.”
शिबिरात डोळे तपासणी, दंत चिकित्सा, ईसीजी या सुविधांसह होमिओपॅथी क्लिनिकची भर पडणार आहे. याचा फायदा रुग्णांना सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणार आहेत.
डॉ. सतीश शिंदे म्हणाले, “या ठिकाणी गोरगरीब रुग्णांना अत्यंत अल्प दरात सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असून याचा फायदा रुग्णांनी घ्यावा.”
डॉ. खैर म्हणाले, “होमिओपॅथी उपचार पद्धती ही एक जादूसारखी काम करते. फक्त त्याचे योग्य निदान करण्याची आवश्यकता आहे. याच पद्धतीने काम करण्याचा माझा मानस आहे.”
या वेळी लायन्स क्लब कऱ्हाडचे सचिव संजय पवार, खजिनदार मिलिंद भंडारे उपस्थित होते.
फोटो
कऱ्हाड येथे लायन्स होमिओपॅथी धर्मादाय क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी खंडू इंगळे यांनी मार्गदर्शन केले.