शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

घडतंय-बिघडतंय : वारुंजी ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांच्यातच धुसफूस!

By प्रमोद सुकरे | Updated: July 12, 2023 22:23 IST

धूर बाहेर येऊ लागल्याने उलटसुलट चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : कऱ्हाड शहरालगत उपनगर म्हणून वारुंजी गावची ओळख आहे. परिणामी, येथील राजकीय घडामोडीकडे सर्वांचे लक्ष कायम लागून राहिलेले असते. येथील ग्रामपंचायतीत सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असली तरी त्यांच्यातच अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. त्याचा धूरही आता बाहेर यायला लागला आहे. त्यामुळे त्याची उलटसुलट चर्चा सुरू आहे.

वारुंजी ग्रामपंचायतीत एकूण १५ ग्रामपंचायत सदस्य आहेत. पैकी १२ काँग्रेस-राष्ट्रवादीचे तर ३ सदस्य भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले गटाचे मानले जातात. निवडणुकीनंतर पहिल्यांदा काँग्रेसच्या शकुंतला पवार यांची सरपंच म्हणून तर राष्ट्रवादीचे नेते आमदार बाळासाहेब पाटील यांचे भाचे अनूज पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

मध्यंतरी पहिल्या सरपंचांनी राजीनामा दिला त्या जागी सुप्रिया पाटील यांची नव्याने सरपंच म्हणून निवड करण्यात आली. तर उपसरपंच अनूज पाटीलच राहिले. आता सत्ताधारी गटातील अनेकांना उपसरपंच व्हावे, असे वाटू लागले आहे. त्यामुळेच ही धुसफूस सुरू झाल्याचे बोलले जाते. त्यांनी काँग्रेसचे स्थानिक नेते नामदेव पाटील यांच्याकडे ही खदखद व्यक्त केल्याचे समजते. आता ते काय निर्णय घेणार? हे पाहावे लागेल.उपसरपंचांच्या विरोधात अर्ज..उपसरपंच अनूज पाटील यांच्या विरोधात तब्बल १० सदस्यांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे एक अर्ज दाखल केला आहे. त्यात अनूज पाटील उपसरपंच पदाचा गैरवापर करीत आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा, असे नमूद करण्यात आले आहे.इथून झाली पाणी मुरायला सुरुवात...वारुंजी ग्रामपंचायतीसाठी जलजीवन मिशनमधून पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाली आहे; पण त्याच्या भूमिपूजनाचे वारुंजीत दोन स्वतंत्र नारळ फुटले. नामदेव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते तर उपसरपंच अनूज पाटील यांनी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते दुसरा कार्यक्रम घेतला.अन् समीकरणे बदलायला लागली..ग्रामपंचायतीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे १२ तर भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांचे गटाचे ३ सदस्य निवडून आले आहेत. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीतच धुसफूस सुरू झाली. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वारुंजीतील कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या सदस्यांसोबतच भाजपच्या गटाचे सदस्यही कार्यक्रमाला हजर दिसले.भविष्यातील राजकारणावर परिणाम...वारुंजी गाव जिल्हा परिषद गटातील मोठे गाव म्हणून ओळखले जाते. नजीकच्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होतील, असे चित्र आहे; पण वारुंजीतील या धुसफुसीचे पडसाद त्यावेळी त्या निवडणुकीत उमटले तर आश्चर्य वाटायला नको.