शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

ठोसेघर विभागात दारूविरोधात भडका

By admin | Updated: January 23, 2015 23:39 IST

रणरागिणी करतायत वाहनांची कसून तपासणी

परळी : ‘ठोसेघर, ता. सातारा येथील रणरागिणींनी दारू विक्रेत्यांच्या विरोधात पुकारलेल्या एल्गाराचा भडका परिसरातील पांगारे, राजापुरी, जांभे, चाळकेवाडीपर्यंत पोहोचला आहे. याठिकाणच्या अवैध दारू विक्रीविरोधात रणरागिणी पदर खोचून सज्ज झाल्या आहेत,’ अशी माहिती ठोसेघरचे सरपंच जयराम चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.ठोसेघर येथे सुरू असलेल्या दारूविक्रीमुळे अनेकांचे संसार धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. या ‘अक्काबाई’च्या पायी अनेक अनुचित घटना घडल्या होत्या. याची दखल घेत ठोसेघरमध्ये रणरागिणींनी रविवारी (दि. १८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दारू विक्रेत्यांकडून ४८ बाटल्यांचे बॉक्स हस्तगत करत त्याच्याच घरासमोरील नाल्यात दारूच्या बाटल्या ओतून संतापाला वाट करून दिली होती. तसेच ठोसेघरमधील दारूच्या विक्रेत्यांच्या घराबाहेर रणरागिणींनी गटागटाने खडा पहारा देत दारू पिण्यास येणाऱ्यास हुसकावून लावले होते. या घटनांचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल ठोसेघर परिसरातील जांभे, राजापुरी, पांगारे, चाळकेवाडी या गावातील महिलांनी घेत जर ‘ठोसेघरच्या महिला दारूबंदी विरोधात लढू शकतात; मग आपण का नाही,’ या विचाराने पेटून उठल्या आहेत. ठोसेघरच्या आंदोलनाची पुनरावृत्ती करण्याचा निश्चयच या महिलांनी केला असून, त्यांनी पं. स. सभापती कविता चव्हाण यांच्याकडे सहकार्याची मागणी केली आहे. (वार्ताहर) वाहनचालक घेतात काळजीठोसघर पठारावर पवारवाडी, बोपारशी, चाळकेवाडी, पांगारे, जांभे व इतर गावांतील लोकांच्या वडाप जीप आहेत. रणरागिणी दि. १८ पासून येणाऱ्या प्रत्येक गाड्यांची कसून चौकशी करत आहेत. गाड्यांमध्ये कोणतीही बॅग, पिशवी असेल त्याचीही चौकशी करत आहेत. यामुळे राजवाडा येथून जाणारे वाहनचालक स्वत: दारू घेऊन जाईल, अशा संशयितांकडून पिशवी, पोते, बॅग किंवा बॉक्स चेक करत आहेत.ठोसेघरच्या महिलांनी दारूबंदीविरोधात घेतलेला पवित्रा स्तुत्य आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे गावातही उठाव होत असल्याने ठोसेघरसह परिसरात दारूबंदीसाठी महिलांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. तसेच पोलीस व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.-राजू भोसले, जिल्हा परिषद सदस्यअवैध दारू विक्रेत्यांविरोधात महिलांनी पुढाकार घ्यावा. ठोसेघर परिसरातील पोलीस प्रशासन आपल्याला सत्य माहिती देणार नाही. त्यामुळे आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आंदोलनावेळी सर्व महिलांच्या खांद्याला खांदा लावून झुंज देईन.-कविता चव्हाण,सभापती, पंचायत समिती, सातारा