शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

तांबवे धरणातून बेकायदा वाळू उपसा

By admin | Updated: June 10, 2017 13:55 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : दररोज शेकडो ट्रक गाळ ; धरण पात्रात २५ ते ३० फूट खोल खड्डे

आॅनलाईन लोकमतलोणंद (सातारा), दि. १0 : सातारा जिल्ह्यातील फलटण आणि खंडाळा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या तांबवे धरणातून गाळ काढण्याच्या नावावर बेकाकायदा वाळू उपसा सुरू आहे. रोज शेकडो ट्रक व डंपर गाळ काढण्याच्या नावाखाली वाळू काढून साठा करत आहेत.

खंडाळा आणि फलटण तालुक्यात छोटे-मोठे पाझर तलाव व धरण असून, या धरणापैकी फक्त तांबवेतील धरणातीलच गाळ काढण्याचा निर्णय घेतला गेला. नक्की परवानगी कोणी व कशी दिली हा खरा प्रश्न निर्माण झाला असून, तालुक्यामध्ये याची उलट-सुलट चर्चा सुरू आहे. धरणातील गाळ काढण्याबरोबरच वाळू उपसाही सुरू असल्याचे गावकऱ्यांनी महसूल विभागाच्या वारंवार लक्षात आणून देऊनही प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे.

तालुक्यातील बोकाळलेल्या वाळू माफियांना आवर घालण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली पाहिजे; परंतु वाळू उपशाकडे कानाडोळा करत त्यांना आश्रय देण्याचे काम प्रशासन करत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे.

खंडाळा व फलटण तालुक्याच्या सीमेवर असणारे तांबवे धरणामध्ये अवैद्यरीत्या वाळू उपसा झाला तर कार्यवाही नेमकी कोणी करायची, हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे वाळू उपसा करणाऱ्या टोळ्या सोकावलेल्या आहेत.धरण क्षेत्रात २५ ते ३० फूट खोल खड्डा खोदून वाळू उपसा होत आहे.