शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षामुळे खांदेकऱ्यांचा पाय खोलात !

By admin | Updated: August 31, 2014 23:30 IST

अंबेदरे ग्रामस्थांची व्यथा : अरुंद पाणंद रस्त्यामुळे पार्थिवाची हेळसांड

सातारा : सातारा शहरालगत असलेल्या अंबेदरे (जाधववाडी-धनवडेवाडी) स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याकडे असलेल्या झुडपांच्या फांद्या रस्त्यावर आल्यामुळे व रस्ता अरुंद असल्यामुळे पार्थिव स्मशानभूमीकडे नेताना खांदेकऱ्यांना आधार शोधावा लागत आहे. पावसाळ्यात या पाणंद रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी, गुडघाभर चिखल, भातखाचरे, पायवाट यामुळे अक्षरश: कसरत करत पार्थिव स्मशानभूमीकडे न्यावे लागते. सातारा शहरापासून सुमारे चार-पाच किलोमीटर अंतरावर अंबेदरे (दरे बुद्रुक) हे गाव आहे. हे गाव जाधववाडी, धनवडेवाडी, मोरेवाडी, भोसलेवाडी, आवाडवाडी, मस्करवाडी, निकमवाडी अशा वाड्या-वस्त्यांचे मिळून आहे व दोन ग्रामपंचायतींत विभागले आहे. त्यामुळे प्रत्येक वाडीनिहाय वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत. या सर्व स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ताही नाही व खासगी जागेत अंत्यविधी केले जातात. जाधववाडी व धनवडेवाडी येथे गेल्या वर्षी नवीन स्मशानभूमीचे बांधकाम झाले; परंतु या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी अजूनही पाणंद रस्ता व पायवाटेचाच वापर करावा लागत आहे. पावसाळ्यात या पाणंद रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याने भरलेले खड्डे व गुडघाभर चिखल असतो व दोन्ही बाजूंच्या झुडपांच्या फांद्या रस्त्यात आल्यामुळे पार्थिवाला आधार देतानाच खांदेकऱ्यांनाही आधार शोधावा लागतो. त्यातच या स्मशानभूमीकडे चारचाकी अथवा दुचाकी गाडी जात नसल्याने अत्यंसंस्कार करण्यासाठी लागणारे साहित्यही ग्रामस्थांना डोक्यावर न्यावे लागते. उन्हाळ्यात ओढा आटल्याने व स्मशानभूमीत पाण्याची पर्यायी सोय नसल्यामुळे ग्रामस्थांना विहिरी किंवा इतरत्र जाऊन पाणी आणावे लागते. स्मशानभूमीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)पावसाळ्यात त्रेधातिरपीट...स्मशानभूमीमध्ये वीज, पाणी, नातेवाइकांना उभे राहण्यासाठी निवारा या सुविधा नसल्यामुळे पावसाळ्यात त्रेधातिरपीट उडते. रात्रीच्या वेळी कंदील, बॅटरी, गॅसबत्तीच्या उजेडात रस्ता शोधावा लागतो. स्मशानभूमीकडे चारचाकी वाहन जात नसल्याने विधीसाठी लागणारे साहित्य डोक्यावरून न्यावे लागते. पाण्याची सोय नसल्याने याठिकाणी कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी, अशी मागणी होत आहे.