शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कार मिळविणाऱ्या मेढ्यात स्वच्छतेकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 22:52 IST

मेढा : ‘शासनाचा स्वच्छतेचा पुरस्कार मिळविणाºया मेढा नगरपंचायतीने स्वच्छतेकडेच दुर्लक्ष केल्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथील बाजारपेठेत कचºयाचे ...

मेढा : ‘शासनाचा स्वच्छतेचा पुरस्कार मिळविणाºया मेढा नगरपंचायतीने स्वच्छतेकडेच दुर्लक्ष केल्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथील बाजारपेठेत कचºयाचे ढीग साठल्याने व दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, यामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली असून, कचºयाचे ढीग त्वरित हटावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या मेढा शहराचे ग्रामपंचायतमधून नगरपंचायतीत रुपांतर झाले आणि नागरिकांना सुविधा निर्माण होतील, अशी आशा निर्माण झाली. मात्र, गेल्या २ वर्षांत मेढा नगरपंचायतीची संथ गतीने चाललेली वाटचाल पाहून नागरिकांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मेढा शहरात मध्यंतरीच्या काळात कचºयाची घंटागाडी बंद होती. सध्या ती सुरू झाली असली तरी शहरातील कचºयाची विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे कचºयाचे ढीग बाजारपेठेत तसेच पडून आहेत. जावळी तहसील कार्यालयाकडे जाणाºया रस्त्यानजीक असलेल्या रेव्हेन्यू क्लबजवळ ओल्या व सुक्या कचºयाचा ढीग गेले काही दिवस पडून आहे, त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीला तोंड देत नाक मुठीत धरून जावे लागत आहे. मेढा शहरातील गटारे तर गेल्या अनेक दिवसांत साफ न केल्याने दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांनी नगरपंचायतीच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.नगरपंचायतीकडून घंटागाडीतून नेला जाणाºया कचºयाची देखील विल्हेवाट लावली जात नाही. हा कचरा स्मशानभूमीनजीक उघड्यावर टाकल्यामुळे वेण्णा नदीचा परिसर देखील दुर्गंधीमय झाला आहे. स्मशानभूमी, जावळी तहसील कार्यालय, येथील कचºयाचे ढीग, स्वच्छ न केलेली गटारे, यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपंचायतीला २ वर्षे स्वच्छतेचा पुरस्कार कोणत्या निकषावर मिळाला, या पुरस्कारासाठी ज्या शासकीय अधिकाºयांनी कागदी घोडे नाचवले, त्याची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.