शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यात थुंकाल तर १५० रुपयांना मुकाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:00 IST

सचिन काकडे। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : रस्त्यावर थुंकणे, घाण करणे अथवा उघड्यावर शौच करणे सातारकरांना आता महागात पडणार ...

सचिन काकडे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : रस्त्यावर थुंकणे, घाण करणे अथवा उघड्यावर शौच करणे सातारकरांना आता महागात पडणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. नगरपालिकेच्या वतीने असे कृत्य करणाऱ्यांकडून जागेवरच १०० ते ५०० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. मंगळवार, दि. २० पासून या मोहिमेस प्रारंभ होणार असून, अशा प्रकारची मोहीम हाती घेणारी सातारा पालिका जिल्ह्यातील पहिलीच पालिका ठरली आहे.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. या अभियानांर्तगत ज्या कुटुंबांकडे शौचालय नाहीत, अशा कुटुंबांना वैयक्तिक अथवा सामुदायिक शौचालय उपलब्ध करून शहरे हागणदारीमुक्त करणे व घनकचरा व्यवस्थापन करून शहर स्वच्छ करणे या प्रमुख बाबींचा समावेश आहे. या अभियानांर्तगत आता सार्वजनिक ठिकाणी घाण करणाºया, रस्त्यावर थुंकणाºया लघुशंका अथवा शौच करणाºया व्यक्तींकडून दंड आकारण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. तसे आदेश शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीने नगरपालिका व नगरपंचायतींना देण्यात आला आहे.सातारा पालिकेनेही आता सार्वजनिक ठिकाणी घाण करणाºयांना दंड करण्याची कडक पावले उचलली आहेत. शासनाने केलेल्या वर्गवारीनुसार दंड आकारला जाणार आहे. मंगळवार, दि. २० पासून पालिकेकेडून या मोहिमेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत एखादा व्यक्ती रस्त्यावर थुंकताना अथवा सार्वजनिक ठिकाणी घाण करताना आढळून आल्यास त्याच्याकडून जागेवरच १०० ते ५०० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे.सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाची पाच पथके मोहिमेसाठी गठीत करण्यात आली आहेत. त्यामुळे ज्यांना रस्त्यात थुंकावयाचे असेल अथवा सार्वजनिक ठिकाणी घाण करावयाची असेल अशांना खिशात पाचशे रुपयांची नोट ठेवूनच घरातून बाहेर पडावे लागणार आहे.आरोग्य विभागाची पाच पथकेया मोहिमेसाठी नगर पालिकेच्या आरोग्य विभागाने पाच पथके गठीत केली आहे. विभाग प्रमुख व तीन आरोग्य निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली साध्या वेशातील ही पथके शहरात विविध ठिकाणी कारवाई करणार आहेत. रस्त्यात थुंकताना अथवा सार्वजनिक ठिकाणी घाण करताना कोणी आढळला तर त्याच्याकडून जागेवरच शासन निर्णयानुसार दंड (स्पॉट फाईन) आकारला जाणार आहे. जर एखाद्याने दंड भरण्यास विरोध दर्शविला तर संबंधित व्यक्ती विरोधात पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा नोंद केला जाणार आहे.पुरावा म्हणून काढणार फोटोएखादा व्यक्तीवर कारवाई करण्यापूर्वी आरोग्य विभागाच्या पथकाकडून संबंधित व्यक्ती रस्त्यात थुंकताना अथवा घाण करीत असताना फोटो काढला जाणार आहे. हा फोटो पुरावा म्हणून वापरला जाणार असून, त्याच्याकडून वर्गनिहाय दंड आकारला जाणार आहे.असा असणार दंडकृती/बाब नगरपरिषदाअ/ब वर्ग क/ड वर्गरस्ते/ मार्गावर घाण करणे १८० १५०सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १५० १००उघड्यावर लघुशंका करणे २०० १००उघड्यावर शौच करणे ५०० ५००