मसूर : ‘तुम्ही श्रमसंस्कार शिबिरातून केलेले श्रमदान आयुष्यात तुम्हाला जगायला शिकवेल. जीवनात तंत्रज्ञानाला विज्ञानाची जोड दिली तर भविष्यात तुम्ही यशस्वी उद्योजक व्हाल,’ असे प्रतिपादन कराड उत्तरचे काँग्रेसचे धैर्यशील कदम यांनी केले.कालगाव येथील शासकीय औद्योीगक प्रशिक्षण संस्थेने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे समारोपप्रसंगी ते बोेलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच मंजूश्री माळी होत्या. तर माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम दीक्षित, माजी पंचायत समिती सदस्य सुनील पाटील, उमेश साळुंखे, प्राचार्य टी. एन. मिसाळ, उपसरपंच उमेश चव्हाण, विकास सोसायटीचे चेअरमन तानाजी फडतरे, तंटामुक्ती अध्यक्ष सोमनाथ चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.धैर्यशील कदम म्हणाले, ‘गेल्या आठ दिवसांत तुम्ही श्रमदानातून या गावात जवळपास दोन लाखांची विकासकामे केली आहेत. थोर संत गाडगेबाबा, महात्मा गांधी यांनी आपणाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज आपण जी कामे केली ती आदर्शवत आहेत. भविष्यात तुम्ही आपल्या गावात असेच समाजकार्य करत असताना कालगाव हे तुमच्या मनात मॉडेल गाव असेल, त्यानुसारच वाटचाल करा व आपले भविष्य घडवा. सार्वजनिक जीवनात यशस्वी झालेले जे उद्योजक आहेत, त्यांनी सुद्धा तांत्रिक शिक्षणच घेतलेले आहे.’ कार्यक्रमास दिलीप चव्हाण, माजी सरपंच डॉ. शंकरराव पवार, उद्धव माळी, शंकर ओंडकर, राजेंद्र पवळे, अमरेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सावंत, अनिल चव्हाण, पी. एम. कामतकर, अशोक सावंत, ग्रामसेवक संजय नलवडे यासह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी आर. पी. पवार यांनी आठ दिवसांत गावात केलेल्या कामाची माहिती देताना एडस जनजागृती, तसेच शिवचरित्र समाजाची गरज या विषयावर व्याख्यान, कालभैरव भजनी मंडळाचा कार्यक्रम आदी विविध कार्यक्रम पार पडले. तसेच विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
तंत्रज्ञानाला विज्ञानाची जोड दिल्यास उद्योजक व्हाल
By admin | Updated: January 19, 2015 00:25 IST