शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

घाई असेल तर वाई विसरा!

By admin | Updated: October 29, 2014 00:21 IST

सततची वाहतूक कोंडी : स्थानिक नागरिकांसह भाविक, पर्यटकांना मनस्ताप

पांडुरंग भिलारे-वाई  -तीर्थस्थळ, पर्यटनस्थळ, चित्रीकरणस्थळ अशा बहुविध पैलूंनी नटलेले वाई शहर राज्यभरात नावारूपाला येत आहे. मात्र, रस्ते तेवढेच राहिल्याने शहर परिसरात वाहतूक कोंडीची समस्या तीव्र बनली असून, त्यावर तातडीने उपाय योजण्याची गरज बनली आहे. पवित्र कृष्णाकाठ आणि महागणपती मंदिरामुळे तीर्थक्षेत्र अशी वाई शहराची ओळख आहे. महाबळेश्वर, पाचगणी, धोम जलाशय, मेणवली या पर्यटनस्थळी जाणारे रस्ते वाईमधूनच जातात. मांढरदेव हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थानही जवळच असून, या भाविकांनाही वाईमार्गेच जावे लागते. तथापि, शहरातील रस्ते अरुंद असून, पूर्वीचीच रचना कायम राहिल्यामुळे, तसेच शहरातील दुचाकी, चारचाकी वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने आता हे रस्ते अपुरे पडू लागले आहेत. ठिकठिकाणी वाहतूक खोळंबल्याचे दृश्य वारंवार दिसू लागले आहे.तालुक्यातून तसेच पाचगणी, महाबळेश्वर येथून नागरिक खरेदीसाठी वाई शहरातच येतात. मात्र वाहतुकीचे कोणतेही नियोजन होत नाही. अरुंद रस्ते, बेशिस्त पार्किंग यामुळे वाहतुकीची सातत्याने कोंडी होते. सामान्यत: आठवडा बाजाराच्या दिवशी, सुट्यांच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. महाबळेश्वर, पाचगणीला सुट्या घालविण्यासाठी पर्यटक प्रचंड संख्येने येऊ लागले आहेत. पाचगणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बाजार समिती ते बसस्थानक रस्ता हे कोंडीचे प्रमुख ठिकाण आहे. सोमवारी आठवडा बाजार भरतो. त्या दिवशी गंगापुरी शाहीर चौक ते किसन वीर चौक या रस्त्यावरील प्रत्येक चौकात कोंडी होते. ग्रामीण रुग्णालय परिसर, पोस्ट आॅफीस परिसर या भागात तर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक, पर्यटक, भाविकांचा वेळ वाया जातो आणि त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रशासनाने वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. वाहतुकीची कोंडी हा नित्याचाच विषय झाला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना व शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने ठोस उपाययोजना करून ही समस्या सोडवावी.- सतीश जेबले, संस्थाचालक, वाईशनिवार-रविवार व सुट्ट्यांच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे प्रवाशांना, स्थानिक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यावर तातडीने उपाययोजना करून नागरिकांना व पर्यटकांना दिलासा द्यावा.- सुहास पाटणे, व्यावसायिक, वाई