शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

हिम्मत असेल तर गड राखून दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 22:48 IST

खटाव/पुसेगाव : ‘सामान्य माणसाच्या अडचणी जाणून भाजपा सरकारने काम करण्यास सुरुवात केल्यामुळे विरोधकांची आता झोप उडाली आहे. कोरेगाव, माण, खटाव, कºहाड उत्तर, कºहाड दक्षिणमध्ये होत असलेले बदल पाहून हे गड आता गेले, याची भीती लागल्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाली आहे. आता मात्र आम्ही उघड आव्हान देतो. हिम्मत असेल तर गड ...

खटाव/पुसेगाव : ‘सामान्य माणसाच्या अडचणी जाणून भाजपा सरकारने काम करण्यास सुरुवात केल्यामुळे विरोधकांची आता झोप उडाली आहे. कोरेगाव, माण, खटाव, कºहाड उत्तर, कºहाड दक्षिणमध्ये होत असलेले बदल पाहून हे गड आता गेले, याची भीती लागल्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाली आहे. आता मात्र आम्ही उघड आव्हान देतो. हिम्मत असेल तर गड सुरक्षित राखा,’ असे आव्हान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.खटाव येथे गौरीशंकर कॉलेजच्या मैदानावर गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शेतकरी मेळावा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, पिंपरी चिंचवड प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपा प्रदेश सचिव मकरंद देशपांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भरत अमळकर, महेश शिंदे, अनिल देसाई, माजी आमदार दिलीप येळगावकर, खटावच्या सरपंच रत्नप्रभा घाडगे, राहुल पाटील, पंचायत समिती सदस्या नीलादेवी जाधव, डॉ. अरुणा बर्गे, पुसेगावच्या सरपंच हेमा गोरे, अनिरुद्ध जगताप, मदन जगताप, भरत मुळे, रणधीर जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री गिरीश महाजन म्हणाले, ‘पश्चिम भागात पाऊस आहे तर पूर्व भागात पाऊस नाही. अशा गावांना पाणी देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. जिहे कटापूर योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू दिवगंत ‘लक्ष्मणराव इनामदार जलसंयोजना’ हे नाव देण्यात आले आहे.’कटगुण ग्रामपंचायतींच्या नूतन सरपंच जयश्री गोरे व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनिल देसाई, शेखर चरेगावकर, सदाशिव खाडे यांची भाषणे झाली.महेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संदीप शिंदे व शहाजी भोसले यांनी सूत्रसंचालन केले. भरत मुळे यांनी आभार मानले.यावेळी रणधीर जाधव, पंचायत समिती सदस्या निलादेवी जाधव, अभयराजे घाडगे, शिवाजी शेडगे, अ‍ॅड. श्रीनावास मुळे, मनोज नलवडे, संजय नलवडे, डॉ. महेश भिसे, उमेश भिसे, अंकुश पाटील यांच्यासह विविध गावचे सरपंच उपस्थित होते.आमदार कोरेगावचा.. राहतो मुंबईत...स्वत:च्या मुलाला कसे पक्षाचे अध्यक्षपद दिले, या विचाराने दुखावल्या गेलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्वत:च्याच पक्षाच्या नेत्याविरोधात एल्गार केला आहे. आमदार कोरेगावचा, राहतो मुंबईमध्ये, कार्यकर्त्यांची गाठ घेतो सहा महिन्यांतून, मुंबईत राहून आमदार म्हणून निवडून देणाऱ्या मतदारांना पाहावयास म्हणून मी खास आलो आहे,’ अशी कोपरखळी यावेळी महाजन यांनी मारली... ते शेतकºयांची व्यथा काय जाणणार?पश्चिम महाराष्ट्रात भाजपाच्या कमळाने आपला रंग दाखवायाला सुरुवात केली आहे. हा बदल पाहून कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडू लागली आहे. माथाडी कामगारांचा नेता शेतकºयांच्या व्यथा काय जाणणार,’ असा घणाघात यावेळी माजी आमदार दिलीप येळगावकर यांनी केला.टंचाई जाहीर करावीमहेश शिंदे यांनी ‘जिहे-कटापूर योजना कोरेगाव-खटावची रक्तवाहिनी आहे. या योजनेमुळे या भागाचा कायापालट होणार आहे. वसना-वांगणा पूर्ण झाली आहे. अद्यापही कोरेगावच्या पूर्व भागात तसेच खटावच्या उत्तर भागात टंचाई आहे. त्यामुळे टंचाई जाहीर करावी,’ अशी मागणी यावेळी महेश शिंदे यांनी केली.