शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
2
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
3
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
4
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
5
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
6
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
7
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
8
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
9
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
10
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
11
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
12
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
13
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
14
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
15
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
16
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
17
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
18
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
19
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
20
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन

दणदणाट कराल तर तुरुंगात!

By admin | Updated: August 31, 2014 00:20 IST

पोलीस मोजणार ध्वनितीव्रता : नियमभंग करणाऱ्या मंडळावर होणार कारवाई

कऱ्हाड : गणेशोत्सवात ध्वनीक्षेपकाचा होणारा अतिवापर नवीन नाही; पण डॉल्बीची थापी रचून दणदणाट करणाऱ्या मंडळांची संख्या सध्या भलतीच वाढलीय. हा दणदणाट रोखण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न झालेत. मात्र, तरीही काही अतिउत्साही कार्यकर्त्यांना समज आलेली नाही. त्यामुळे यावर्षी पोलीस दलाने कडक धोरण अवलंबले असून, ध्वनीमर्यादा ओलांडणाऱ्या मंडळावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतलाय.गणेशोत्सव कालावधीत कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जातात. ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात येतो. मात्र, सध्या बंदोबस्ताबरोबरच पोलिसांना मंडळांच्या ध्वनीतीव्रतेवरही लक्ष केंद्रित करावे लागत आहे. मंडळांकडून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी गणेशोत्सवापूर्वी पंधरा दिवस अगोदरच पोलिसांकडून हालचाली केल्या जातात. शांतता समिती, गुन्हे नियंत्रण समिती तसेच गणराया अ‍ॅवॉर्ड समितीची बैठक घेतली जाते. त्या बैठकीत ध्वनी मर्यादेबाबत सविस्तर माहिती देण्यात येते. तसेच सर्व संघटना, गणेश मंडळांची एकत्रित बैठक घेऊन त्यांना त्याबाबत सूचनाही केल्या जातात. मात्र, एवढे करूनही अनेकवेळा मंडळांकडून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केले जाते. न्यायालयाच्या निर्देषानुसार क्षेत्रनिहाय ध्वनीमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास यापूर्वी पोलिसांकडून संबंधित मंडळाला समज देण्यात येत होती. कधी-कधी दंडात्मक कारवाईही व्हायची; पण तरीही ध्वनी तीव्रतेबाबत मंडळांकडून योग्य खबरदारी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे सध्या पोलिसांनी कडक धोरण अवलंबले आहे. (प्रतिनिधी)एक लाख दंड, तीन वर्षे शिक्षाध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या डॉल्बी अथवा ध्वनीक्षेपकाचा आॅपरेटर, मालक व मंडळाच्या कार्यकारिणीवर पोलिसांकडून तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच ध्वनीक्षेपकाची सामूग्रीही जप्त केली जाणार असून, ध्वनीमर्यादा उल्लंघन करणाऱ्यास कायद्यानुसार एक लाख रुपये दंड अथवा तीन वर्षे कारावास, अशी शिक्षा आहे. ...अशी होणार कारवाईध्वनीतीव्रता जास्त वाटल्यास पोलीस ठाण्याला माहिती कळवावीदूरध्वनीवर तक्रार आल्यास तत्काळ संबंधित ठिकाणी तपासणीगस्त पथकाला ध्वनीक्षमता जास्त जाणावल्यास मोजमापकारवाई करून ध्वनीक्षेपकासह इतर सामूग्री जप्ततपासणीची चित्रफीत४ध्वनीमर्यादा ओलांडणाऱ्या मंडळावर कारवाई केल्यानंतर काहीवेळा वाद उद्भवतो. मर्यादा ओलांडलीच नव्हती, असा बचाव मंडळाची कार्यकारिणी व ध्वनीक्षेपकाचा मालक, आॅपरेटरकडून होतो. त्यामुळे यावर्षी तपासणीवेळी पंचांसमक्ष चित्रीकरण करून ध्वनीक्षेपकांची ध्वनीतीव्रता तपासण्यात येणार आहे. एक कर्मचारी, एक मशीन४गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला ध्वनीतीव्रता मापक मशीन पुरविण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी ध्वनीतीव्रता तपासण्यासाठी नेमण्यात आला असून, संबंधित कर्मचाऱ्याने वेगवेगळ्या मंडळांच्या ठिकाणी आवाजाची तीव्रता तपासून त्याबाबत वरिष्ठांना माहिती द्यावयाची आहे.