शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वेळ आली तर दिल्लीत जाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 23:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : ‘कोणी पेन्शन मिळवून देता का रे पेन्शन?, अशी आर्त साद घालणाºया, वार्धक्याकडे झुकलेल्या माजी सैनिकाच्या मदतीला उंब्रज येथील आर्मी हाऊस धावून गेले आहे. सेवानिवृत्त कॅप्टन अ‍ॅड. इंद्रजित जाधव उंब्रज व परिसरातील आजी-माजी सैनिकांच्या संघटनेच्या सहकार्याने माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना पेन्शन मिळवून देण्यासाठी पुढे आले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : ‘कोणी पेन्शन मिळवून देता का रे पेन्शन?, अशी आर्त साद घालणाºया, वार्धक्याकडे झुकलेल्या माजी सैनिकाच्या मदतीला उंब्रज येथील आर्मी हाऊस धावून गेले आहे. सेवानिवृत्त कॅप्टन अ‍ॅड. इंद्रजित जाधव उंब्रज व परिसरातील आजी-माजी सैनिकांच्या संघटनेच्या सहकार्याने माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना पेन्शन मिळवून देण्यासाठी पुढे आले आहेत. वेळ आली तर दिल्लीत जाऊन पाठपुरावा करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.देशसेवेत अग्रेसर असणाºया सातारा जिल्ह्यातील एका माजी सैनिकाची परिस्थिती ‘लोकमत’मध्ये मांडल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटले. ‘हक्काच्या पेन्शनसाठी ५० वर्षे सैनिकाचा लढा’ ही बातमी उंब्रज व परिसरात चांगलीच चर्चेत राहिली. या माजी सैनिकाची व्यथा जगापुढे आली. उंब्रज येथील सेवानिवृत्त कॅप्टन अँड. इंद्र्रजित जाधव यांनी ‘लोकमत’शी संपर्क साधला आणि माजी सैनिक हणमंतराव पाटील यांची माहिती घेतली. पाटील यांच्याबरोबर संपर्क करून जाधव यांनी त्यांच्या जवळ असलेल्या कागदपत्राच्या छायांकित प्रतींचा एक संच स्वत: जवळ घेतला आहे.माजी सैनिक पाटील यांच्या जवळची सर्व कागदपत्रे जाधव यांनी तपासली आहेत. ही सर्व कागदपत्रे त्यांनी क्रमवारीत जोडली आहेत आणि व्यक्तिगत लक्ष घालून ते पाटील यांना पेन्शन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. वेळप्रसंगी स्वखर्चाने दिल्लीला जावे लागले तरी जाण्याची तयारी त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दर्शविली.