शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

एकरकमी एफआरपी न मिळाल्यास राज्यभर आंदोलन

By admin | Updated: October 2, 2015 23:33 IST

राजू शेट्टी : ठोस पावले न उचलल्यास कोणालाही दिवाळी गोड लागू देणार नाही

सातारा : ‘तीन टप्प्यांत शेतकऱ्यांना एफआरपी देण्याचा घाट घातला जात आहे. वार्षिक सभेत ऐनवेळी विषय घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल चालविली आहे. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी राज्यभरातील शेतकरी अर्ज करून ते अर्ज शासनाला मोर्चा काढून देणार आहोत, याची सुरुवात दि. १६ रोजी कोल्हापूर येथे साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चाने होणार आहे, त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यभरातही हे आंदोलन सुरू राहणार आहे. दरम्यान, सरकारने याबाबत ठोस पावले उचलली नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरू. कोणाला यंदा दिवाळी खाऊ देणार नाही,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला. खासदार राजू शेट्टी शुक्रवारी साताऱ्यात आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार शेट्टी म्हणाले, ‘जिल्हा बँका या राजकारणांचा अड्डा बनत असून, पूर्वीच्या सरकारने आमच्या विरोधात सूडबुद्धीने गुन्हे दाखल केले आहेत. पुढील वर्षी उसाचा हंगाम सुरू होईल. त्या हंगामात साखर कारखानदारांनी तीन टप्प्यांत एफआरपी रक्कम देण्याचा विषय वार्षिक सभेत घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल चालविली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो तेव्हा खरे वास्तव समजले, असे काहीच झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. जे कारखाने एकरकमी एफआरपी देणार नाहीत. त्यांच्यावर शुगरकेन कंट्रोल १९६६ नुसार कारवाई केली पाहिजे, जे कारखाने एफआरपी देत नाहीत. त्या कारखान्यांच्या संचालक मंडळावर कारवाई करावी, असा शासनाकडे आग्रह धरणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेत आहोत. ज्या कारखान्याबरोबर करार केला आहे. त्या कारखान्याने एफआरपीप्रमाणे दर द्यावा, हे अर्ज गोळा करून १६ आॅक्टोबरला कोल्हापुरात साखर आयुक्तांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. असा इशाराही खा. शेट्टी यांनी दिला. (प्रतिनिधी)