शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
2
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
3
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
4
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
5
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
6
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
7
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
8
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
9
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
10
बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात
11
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
12
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
13
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
14
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
15
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
16
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
17
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
18
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
19
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
20
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा

उद्योगात गुंडप्रवृती येत असेल तर मोडून काढू; पालकमंत्र्यांचा उद्योजकांना विश्वास 

By नितीन काळेल | Published: December 21, 2023 9:18 PM

साताऱ्यात इंडस्ट्रियल एक्स्पोचे उद्घाटन...

सातारा : राज्य शासन उद्योजक आणि उद्योगांबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे साताऱ्यातील एमआयडीसीतही नवीन उद्योग यावेत, प्रगती व्हावी यासाठी सर्वोताेपरी प्रयत्न केले जातील. यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून ‘मास’चे प्रश्न मार्गी लावू. त्याचबरोबर येथील एमआयडीसीत गुंडप्रवृती येत असेल, प्रगतीला अडथळा होणार असेलतर ती मोडून काढू, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उद्योजकांना दिला.

सातारा येथील जिल्हा परिषद मैदानावर मॅन्यूफॅक्चरिंग असोसिएशन आॅफ सातारा (मास) आयोजित मास इंडस्ट्रियल एक्स्पोचे उद्घाटन करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते, उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, सचिव धैर्यशिल भोसले, कूपर कार्पोरेशनचे अस्लम फरास, हिंदुस्थान फिडसचे अध्यक्ष नितीन माने, वसंतराव फडतरे, श्रीकांत पवार, युवराज पवार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘सातारा एमआयडीसीला खूप जुनी परंपरा आहे. येथे मोठ्या आणि नामांकित कंपन्या आणि उद्योग होते. एमआयडीसीच्या जवळ उद्योग वाढवायचे असतील तर सुरुवातीला खूप विरोध होतोच. साताऱ्याच्या एमआयडीसी संदर्भात निगडी, वर्णे येथील शेतकऱ्यांचे काही गैरसमज असतील तर ते सोडवले पाहिजेत. उद्योगवाढीसाठी शासनही सकारात्मक असून सातारा तसेच जिल्ह्यातील एमआयडीसीच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण भेटू. त्यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील.

मासचे अध्यक्ष मोहिते म्हणाले, मासची स्थापना १९९८७ साली उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात आली. आपण आज उद्योगातून १३ हजार कोटी रुपयांची निर्यात करत आहोत. हे शक्तीस्थान आपण अधोरेखित केलेले आहे. विद्याऱ्श्यांनी या प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन उद्योजक व्हावे, अशी अपेक्षा आहे.

धैर्यशील भोसले यांनी साताऱ्यातील उत्पादने जागितक पातळीवर जाण्याचा हा प्रयत्न आहे असे सांगतानाच सातारा एमआयडीसीत ९०० उद्योजक चांगल्याप्रकारे काम करत असल्याचा विश्वासही व्यक्त केला.

एमआयडीसीबाबत गैरसमज नको -आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा एमआयडीसबाबत आवाहन केले. ते म्हणाले, सातारा एमआयडीसी वाढविण्यासाठी मर्यादित पर्याय आहेत. तेच आपल्याला वापरावे लागणार आहेत. काहींची एमआयडीसी नको अशी धारणा आहे. पण, शासनाचीही धोरणे बदललीत. रेडीरेकनरपेक्षा चारपटीने जादा पैसे दिले जातात. त्यामुळे लोकांतील गैरसमज बदलावे लागणार आहेत. निगडी, वर्णे भागात एमआयडीसी वाढली पाहिजे. कारण, येथील महामार्गाची संलग्नता असल्याने त्याचा फायदा घेण्याची गरज आहे. एमआयडीसीसाठी बागायती जमिनी नको आहेत. ज्या पडीक आहेत, पाणी पोहोचत नाही ती जमीन द्यावी, असे आवाहनही शिवेंद्रसिंहराजेंनी केले. 

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईShiv Senaशिवसेना