शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

संविधान बदलल्यास सत्यानाश!

By admin | Updated: April 17, 2016 23:27 IST

रामदास आठवले : गांधी मैदानावरील सभेत इशारा; राज्यातील शिवसेना-भाजपचे सरकार दलितांच्या मतामुळेच...

सातारा : ‘धर्म, भाषा यावर तुटत चाललेला भारत अखंड ठेवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न झाला तर सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे खासदार रामदास आठले यांनी दिला. दरम्यान, यावेळी त्यांनी दलित समाजाच्या मतामुळेच राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आल्याचे ठामपणे सांगितले. दि. २६ जानेवारीपासून ‘जाती तोडो, समाज जोडो’ या अभियानांतर्गत कन्याकुमारी येथून ‘भारत भीमरथ’ची सुरुवात झाली आहे. हा रथ शनिवारी रात्री साताऱ्यात आला होता. त्यावेळी गांधी मैदानावर आयोजित सभेत खासदार आठवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ‘रिपाइं’चे राज्य उपाध्यक्ष किशोर तपासे, जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, ‘रिपाइं’च्या कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद गायकवाड, अण्णा वायदंडे, सतीश गायकवाड, अप्पा तुपे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार आठवले म्हणाले, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती देशभरात उत्साहात साजरी केली. डॉ. आंबेडकर यांचे विचार सर्वांनाच पटलेले आहेत.आता जातिभेद संपविण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. यापुढे समतावादी भारत निर्माण करायचा असून, त्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावा लागणार आहे. राज्यातील मराठा व मुस्लीम समाजालाही आरक्षण मिळायला हवे, अशी आमची भूमिका आहे,’ असेही आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. किशोर तपासे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ‘रिपाइं’चे कार्यकर्ते उपस्थित होते. शरद गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)सहा महिन्यांत गाव तिथे शाखा...या कार्यक्रमात अशोक गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. आगामी सहा महिन्यांत ‘गाव तेथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता’ असणार आहे. ही भूमिका घेऊनच बाहेर पडणार आहे. गेल्या १५ वर्षांपासून जिल्ह्यातील पक्षाची जबाबदारी खांद्यावर आहे. त्यामुळे सर्व स्तरातील लोक पक्षाशी जोडले गेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.