शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

संविधान बदलल्यास सत्यानाश!

By admin | Updated: April 19, 2016 01:04 IST

रामदास आठवले : गांधी मैदानावरील सभेत इशारा; राज्यातील शिवसेना-भाजपचे सरकार दलितांच्या मतामुळेच...

सातारा : ‘धर्म, भाषा यावर तुटत चाललेला भारत अखंड ठेवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न झाला तर सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे खासदार रामदास आठले यांनी दिला. दरम्यान, यावेळी त्यांनी दलित समाजाच्या मतामुळेच राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आल्याचे ठामपणे सांगितले. दि. २६ जानेवारीपासून ‘जाती तोडो, समाज जोडो’ या अभियानांतर्गत कन्याकुमारी येथून ‘भारत भीमरथ’ची सुरुवात झाली आहे. हा रथ शनिवारी रात्री साताऱ्यात आला होता. त्यावेळी गांधी मैदानावर आयोजित सभेत खासदार आठवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ‘रिपाइं’चे राज्य उपाध्यक्ष किशोर तपासे, जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, ‘रिपाइं’च्या कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद गायकवाड, अण्णा वायदंडे, सतीश गायकवाड, अप्पा तुपे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार आठवले म्हणाले, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती देशभरात उत्साहात साजरी केली. डॉ. आंबेडकर यांचे विचार सर्वांनाच पटलेले आहेत.आता जातिभेद संपविण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. यापुढे समतावादी भारत निर्माण करायचा असून, त्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावा लागणार आहे. राज्यातील मराठा व मुस्लीम समाजालाही आरक्षण मिळायला हवे, अशी आमची भूमिका आहे,’ असेही आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. किशोर तपासे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ‘रिपाइं’चे कार्यकर्ते उपस्थित होते. शरद गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)सातारा येथील कार्यक्रमात रामदास आठवले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी किशोर तपासे, अशोक गायकवाड, शरद गायकवाड उपस्थित होते.