लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘मी नेहमी भ्रष्टाचाराविरोधात बोलत असतो, त्यावेळी माझ्यावर तोडपाणीचे आरोप केले जातात. काम करताना आरोप झाले की खूपवेदना होतात. असे झाले की, राजकारणातून थांबावे वाटते. १९९९ मध्ये याच आरोपांमुळे २२ महिने घालविले आहेत. आताही तोच प्रयत्न सुरू आहे,’ असा गौप्यस्फोट खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.साताºयात पत्रकारांशी उदयनराजे बोलत होते. ते म्हणाले, माझ्यावर प्रेम असणारे नेते, आमदार माझ्याबद्दल तक्रार करतात त्यांना उदंड आयुष्य लाभो, पुढच्या जन्मीही त्यांचाच सहवास मला लाभो.फलटणचा एक नगरसेवक आणि आमचे प्रिय आमदार यांच्या जवळच्या लोकांवरच खंडणीचे गुन्हे दाखल असूनही, हे माझ्यावर आरोप करत आहेत,’ असेही खासदार उदयनराजे भोसले म्हणाले... तर घंटा गाड्या बदलणार!भ्रष्ट कारभाराविरोधात मी नेहमीच बोलत असतो. लोकांसाठी काम करण्याचा वारसा आहे. वडिलांनी लोकांसाठी काम केले मी सुद्धा तेच करतोय. हे करताना लोकांना त्रास होईल, असे कोण वागले तर खपवून घेणार नाही. आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, एक महिन्यात चांगली सेवा दिली नाही तर, घंटा गाड्या बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माझ्यावर १९९९ चा प्रयोग करण्याची पुन्हा तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:16 IST