शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मला साडेतीन लाखांचेच मताधिक्य; उदयनराजेंचा दावा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:59 IST

सातारा : ‘सातारा लोकसभा मतदार संघात आपल्याला खात्रीने साडेतीन लाखांचे मताधिक्य आहे,’ असा दावा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ...

सातारा : ‘सातारा लोकसभा मतदार संघात आपल्याला खात्रीने साडेतीन लाखांचे मताधिक्य आहे,’ असा दावा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. ‘मी राजीनामा देतो पुन्हा फेरमतदान होऊ दे. तितक्याच मताधिक्याने निवडून येईन,’ असा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरद्वारे फेरनिवडणूक घेण्याची तयारी आहे का ?, असा सवाल उपस्थित केला आहे.येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईव्हीएम मशीनमुळे लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप करत उदयनराजे यांनी ही यंत्रणा म्हणजे देशाच्या व्यवस्थेला लागलेली कीड आहे, ती उखडून टाकायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने अधिकाराने या विषयावर भाष्य करायला हवे. मात्र, या विषयावर दाद मागणाºयालाच कारवाईची भाषा वापरली जाते, हे चुकीचे असल्याचे मत खा. उदयनराजे यांनी व्यक्त केले.देशभरातील ३७६ मतदार संघांमध्ये ईव्हीएम मशीनमधील मतांच्या आकडेवारीत घोळ झाला आहे. सातारा लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान व मतमोजणी यांच्यामध्ये चक्क ६७२ मतांचा फरक आहे.ईव्हीएम मशीनच्या वैधतेबाबत कायदेपंडितांनी जी ठामपणे विधाने केली ती कोणत्या आधारावर केली. निवडणूक ही जनतेच्या पैशांवर होते, त्याची उधळपट्टी करण्याचा अधिकार कोणाला नाही. एक हजार मते मोजणाºया एका ईव्हीएम मशीनची किंमत तेहतीस हजार म्हणजे एका मताची किंमत १ रुपया ३० पैसे आणि बॅलेट पेपरने निवडणूक घेतल्यास अवघा तेराशे रुपये खर्च येतो. ईव्हीएम मशीनवर तब्बल ४ हजार ५५५ कोटी रुपये खर्च झाला. जर ईव्हीएम मशीन निर्वेध होत्या, मग सहा विधानसभा मतदार संघात ६७२ मतांचा फरक कसा पडला ? असा सवाल उदयनराजे यांनी केला....मग राजेशाही काय वाईट होती?उदयनराजे कधी रडीचा डाव खेळत नाही, लोकशाहीचा गळा घोटणाºया या यंत्रणेपेक्षा राजेशाही काय वाईट होती ? या प्रकाराला वेळीच पायबंद घातला नाहीतर १८५७ च्या बंडाप्रमाणे सर्वत्र रक्तपात होऊन सारी व्यवस्था नष्ट होईल, अशी भीती उदयनराजे यांनी व्यक्त केली.