शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर चिऊ परतलीच नाही!

By admin | Updated: December 22, 2014 00:07 IST

गायत्री जमदाडे मृत्यू प्रकरण : नीरा-उजवा कालव्यात सात दिवसांनी मृतदेह सापडला

शिरवळ : रविवार... शाळेला सुटी... अहिरे येथील चिऊ (गायत्री) मैत्रिणींबरोबर खेळण्यात दंग... मैत्रिणीच्या घरून स्वत:च्या अंगणात खेळायला आलेली चिऊ अचानक गायब... सर्वत्र शोधाशोध... पण, अखेर चिऊ परतलीच नाही....अन् टिंकू श्वान जागेवरच घुटमळले, ही परिस्थिती आहे वाठार कॉलनी ाावच्या हद्दीतील नीरा-उजवा कालव्यात आढळलेल्या सहा वर्षीय बालिकेच्या मृतदेहाजवळील. चिऊ ऊर्फ गायत्री संतोष जमदाडे (वय ६, रा. अहिरे, ता. खंडाळा) असे दुर्देवी मृत बालिकेचे नाव आहे.वाठार कॉलनी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत असणाऱ्या वीर धरणाजवळील नीरा उजवा कालव्यावरील पुलापासून शंभर ते दीडशे मीटरवर कालव्यामध्ये बारदाण्याच्या पोत्यामध्ये अज्ञात मुलीचा मृतदेह आढळून आला. ही घटना वाठार बुद्रुक येथील रहिवासी दीपक सुरेश तारू हे कॅनॉलच्या रस्त्याने मोटारसायकलवरून घरी निघाले असताना कॅनॉलच्या पाण्यातून घाणेरडा वास आल्याने त्यांनी थांबून कॅनॉलमध्ये डोकावून पाहिले असता बारदाण्यामध्ये अर्धा पाण्यात व अर्धा पाण्याच्याकडेला पालथ्या अवस्थेमध्ये एका बालिकेचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले.यावेळी दीपक तारू यांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक रहिवाशांना व लोणंद पोलीस स्टेशनला कळविली. त्यानंतर लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल माकणीकर तातडीने दाखल झाले, तर खंडाळा ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके दाखल झाले.दरम्यान, यावेळी घटनास्थळी ‘टिंकू’ या श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. याप्रसंगी घटनास्थळी आढळलेल्या लहान मुलीच्या चपला व बारदाण्याचे वास टिंकूला दिला. मात्र, टिंकू श्वान घटनास्थळापासून काहीच अंतरावर घुटमळल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. यावेळी कॅनॉलमध्ये पडलेल्या मृतदेहाची पाहणी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व पोलिसांनी करीत घटनास्थळी आढळलेल्या केसांचे व हाडांचे नमुने व बारदाणे पोलिसांनी जप्त केले. दरम्यान, मृतदेह पूर्णपणे छिन्नविच्छिन्न व सडलेल्या अवस्थेत असल्याने तसेच पायांचे दोन्ही पंजे व एका हाताचे पंजे प्राण्यांनी किंवा माशांनी खाल्लेले असल्याने बालिकेच्या मृतदेहाची ओळख पटविणे अवघड बनले होते. मात्र, रात्री उशिरा अहिरे येथील अपहरण केलेल्या गायत्री जमदाडेचे वर्णन व मृतदेहाचे वर्णन जुळत असल्याने संबंधित मृतदेहावरील कपडे व मृतदेह वडील संतोष जमदाडे यांना दाखविला असता, तो मृतदेह गायत्रीचाच असल्याचे निष्पन्न झाले. रात्री उशिरापर्यंत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल माकणीकर, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट लोणंद पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून होते. शवविच्छेदनासाठी पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आला. त्याठिकाणी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले आहे. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांचे पथक तपासासाठी रवाना झाले आहे. (प्रतिनिधी)