शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जागृती मंडळाने राबविली स्वच्छता मोहीम

By admin | Updated: December 3, 2015 23:49 IST

जागतिक प्रदूषण नियंत्रण दिन : वेंगुर्ले येथील कॅम्प मैदानाची स्वच्छता

वेंगुर्ले : जिल्हा पोलीस कार्यालयातर्फे सागरेश्वर किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, तर दुसरीकडे येथील पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या तालुका क्रीडा केंद्राच्या मैदानावरील दारूच्या रिकाम्या बाटल्या व काचा जागृती क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी गोळा करून स्वच्छता अभियान राबविले. या बाटल्यांमुळे खेळाडूंना मोठा त्रास सहन करावा लागला.जागतिक प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त येथील जागृती मंडळातर्फे येथील कॅम्प मैदानावर गुरुवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. येथील पालिकेच्या मालकीच्या व वेंगुर्ले तालुका क्रीडा केंद्राच्या ताब्यात असलेल्या पोलीस ठाण्याच्या समोरीलच क्रीडा मैदानावर दारूच्या पार्ट्या होत असतात. हे दारुडे दारूच्या बाटल्या मैदानावर टाकतात, तसेच काही वेळा हे दारुडे दारूच्या नशेत बाटल्या फोडतात. त्यामुळे खेळाडूंना इजा होते. मात्र, या प्रकाराकडे तालुका क्रीडा केंद्र्राचे दुर्लक्ष होत आहे. येथील पोलीस ठाण्यापासून केवळ १00 मीटरवर असलेल्या कॅम्प मैदानात दारूच्या पार्ट्या करून अस्वच्छता करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत नाहीत, तसेच या ठिकाणची स्वच्छता पोलीस विभाग, पालिका व क्रीडा केंद्र संचालक का करत नाहीत, असा सवाल नागरिकांतून होत आहे. कॅम्प मैदानाची सकाळी जागृती क्रीडा मंडळाच्या अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या ७० प्रशिक्षणार्थ्यांनी ही सफाई केली. यावेळी तेथे उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष शेखर कोयंडे, नगरसेवक यशवंत ऊर्फ दाजी परब, अ‍ॅड. शुभांगी सडवेलकर यांनी या छोट्या खेळाडूंचे कौतुक केले. तालुका क्रीडा केंद्र चालविणाऱ्या संस्थेने मैदानावर होणाऱ्या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.