शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून पतीचा खून!

By admin | Updated: June 5, 2016 00:41 IST

पत्नीला अटक :प्रियकर असलेला तुपेवाडीचा माजी सरपंच फरार

वडूज/ कातरखटाव : खटाव तालुक्यातील तुपेवाडी येथे पत्नीच्या अनैतिक संबंधास विरोध केल्याच्या कारणावरून ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा कर्मचारी ब्रह्मदेव उत्तम तुपे (वय ३८) यांचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली असून, माजी सरपंच असलेला प्रियकर फरार झाला आहे. याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी ब्रम्हदेव तुपे हे राहत्या घरात पडलेल्या स्थितीत आढळून आले. घरातील छताच्या अँगलला साडीबरोबरच टेलिफोनच्या वायरीचा तुकडाही लोंबकळताना दिसला. अंत्यसंस्काराचा विधी पार पडल्यानंतर मृताचा भाऊ सुनील याने संशयित स्वाती व तिचा प्रियकर धनाजी काटकर यांच्या विरोधात वडूज पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद केला. स्वाती हिला वडूज पोलिसांनी अटक केली असली तरी संशयित मानेवाडी-तुपेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचा माजी सरपंच व वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीचा माजी संचालक धनाजी शिवाजी काटकर (रा. मानेवाडी) हा प्रियकर फरार आहे. स्वातीच्या जबाबानंतर या घटनेचे रहस्य उलगडेल. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी मृत्यू ! मृताचा भाऊ व इतर मंडळी घरात गेली असता प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचा सर्वांना भास झाला. मात्र, आतील सारी परिस्थिती पाहून त्यांना हा खुनाचा प्रकार असल्याची दाट शंका आली. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. वडूज ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.(प्रतिनिधी)