शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

हनिमुनला जातानाच पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 14:12 IST

वाई : पसरणी घाटामध्ये पुण्याच्या युवकाचा झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात वाई पोलिसांना यश आले असून, हा खून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी प्रियकर निखिल सुदाम मळेकर (वय २४, रा. चिखली, निगडी, पुणे) व नवविवाहिता दीक्षा आनंद कांबळे (२४, रा. औंध, पुणे) या दोघांना अटक केली असून ...

वाई : पसरणी घाटामध्ये पुण्याच्या युवकाचा झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात वाई पोलिसांना यश आले असून, हा खून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी प्रियकर निखिल सुदाम मळेकर (वय २४, रा. चिखली, निगडी, पुणे) व नवविवाहिता दीक्षा आनंद कांबळे (२४, रा. औंध, पुणे) या दोघांना अटक केली असून पाचजण फरार आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वरला फिरायला निघालेल्या एका नवविवाहित दाम्पत्यावर पसरणी घाटात शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी आनंद ज्ञानदेव कांबळे (वय ३२ रा. औंध, पुणे) यांच्यावर कोयत्याने डोक्यात वार करून खून केल्याची घटना घडली होती.आनंदने मित्र राजेश बोबडे याच्यासोबत महाबळेश्वरला फिरण्यासाठी जाण्याचे नियोजन केले होते. हे दीक्षाने निखिलला सांगितले. त्यानुसार निखिल एक दिवस अगोदर महाबळेश्वर परिसरात येऊन थांबला होता. शनिवारी सकाळी पुण्याहून आनंद कांबळे व दीक्षा तसेच राजेश बोबडे व त्याची पत्नी कल्याणी असे चौघेजण कारमधून (एमएच १४ जीएक्स ७१७१) महाबळेश्वरला फिरायला निघाले. दरम्यान, दीक्षा मोबाईलद्वारे निखिलच्या संपर्कात होती. त्याने केलेल्या कटाचा भाग म्हणून कार पसरणी घाटात येताच दीक्षाने उलटीचा त्रास झाल्याचे नाटक करून गाडी बाजूला घेण्यास सांगितले. आनंद व दीक्षा गाडीतून उतरून थोडे बाजूला उभे राहिले. यावेळी राजेश व कल्याणी संरक्षक कठड्यावर बसून फोटो काढत होते. यावेळी पाचगणीहून दोन दुचाकींवरून आलेल्या निखिल याने आपल्या मित्रांच्या मदतीने दीक्षाला पकडून ठेवले तर इतर दोघांनी आनंदवर कोयत्याने वार केले. आनंद रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तर दीक्षा किरकोळ जखमी झाली.चौकशीनंतर खुनाची कबुलीस्थानिक गुन्हे शाखा व वाई पोलिसांनी २४ तासांत खुनाचा उलगडा करून दीक्षा व तिचा प्रियकर निखिल मळेकर या दोघांनाही वाई ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. दीक्षा ओव्हाळ (कांबळे) व निखिल मळेकर यांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दीक्षाच्या मनाविरुद्ध लग्न झाल्याने काही दिवसांपूर्वी निखिलच्या मदतीने पती आनंदच्या खुनाचा कट रचला.