शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरात हुर्रर... कोरेगावात भुर्रऽऽर !

By admin | Updated: July 15, 2017 13:07 IST

पावसाचा लपंडाव : बळीराजाच्या नजरा आभाळाकडे

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. १५ :विश्रांतीनंतर मान्सून जिल्ह्यात पुन्हा सक्रिय झाला असून अतिपर्जन्यवृष्टीच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू आहे. पश्चिमेकडे पावसाने हजेरी लावली असताना पूर्वेकडे मात्र अद्यापही मान्सूनने पाठ फिरवली आहे. आजपर्यंत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर तर सर्वात कमी कोरेगाव तालुक्यात झाला आहे.महाबळेश्वर हे पावसाचे आगार म्हणून ओळखले जाते. आजपर्यंत याठिकाणी सर्वाधिक १ हजार ६९७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. महाबळेश्वर खालोखाल जावळी, पाटण तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र, पूर्वेकडील माण, खटाव फलटण अन् कोरेगाव तालुका मात्र अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यात १ जून पासून आजपर्यंत सर्वात कमी ९० मिलीमीटर पाऊस कोरेगाव तालुक्यात झाला आहे. कोरेगाव, खटाव तालुक्यात दोन दिवसांमध्ये पावसाचा शिडकावा पडला. मात्र, खरीप पिकांसाठी अजुुनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. पाऊस लांबत चालल्याने दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे.

२४ तासात २३१ मिलीमीटर पाऊस

 

सातारा जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर व शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २४ तासात तब्बल २३१.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ३ हजार ८४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी ३४९.७ मिलीमीटर आहे. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे (कंसात एकूण पाऊस) : सातारा २०.५ (२६७.८), जावळी ३३.९ (५१२), पाटण २९.२ (३६८.८), कऱ्हाड १४.९ (११०.३), कोरेगाव ४.१ (९०.१), खटाव ३.८ (१६०.७), माण शून्य (१७९.९), फलटण शून्य (१०६.८), खंडाळा ४.७ (१३९.०), वाई १३.५ (२१२.४), महाबळेश्वर १०६.७ (१६९७.९)