शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉटर कप’मधील सहभागी गावांना दीड कोटी: शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:08 IST

दहिवडी : ‘माण, खटाव तालुक्यांतील असंख्य गावं दुष्काळाचा सामना करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाली आहेत. त्यांना पाठबळ देण्यासाठी ...

दहिवडी : ‘माण, खटाव तालुक्यांतील असंख्य गावं दुष्काळाचा सामना करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाली आहेत. त्यांना पाठबळ देण्यासाठी डिझेलसाठी खर्च म्हणून खासदार निधीतून दीड कोटी रुपये लवकर देण्यात येईल,’ अशी घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली.खासदार शरद पवार रविवारी दुष्काळी माण तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता शिंदी खुर्द येथे सुरू असलेल्या कामाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, रोहित पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, उद्योग मंत्रालयाचे सचिव डॉ. नामदेव भोसले, प्रवीण इंगवले, तेजस शिंदे, कविता म्हेत्रे, शिवाजी सर्वगौड, संदीप मांडवे उपस्थित होते.पवार म्हणाले, ‘निसर्गाची अवकृपा असल्याने दुष्काळ पाचवीला पुजला आहे. सरकार सरकारची जबाबदारी पार पाडतंय; पण ग्रामस्थ म्हणून तुम्हीही जबाबदारीने काम करताय. सकाळी लवकर उठून काम करता. बाहेरगावी नोकरीला असणारी मंडळी शनिवार, रविवारी गावाकडे येतात. एवढी जिद्द, चिकाटी महाराष्ट्रात कमी ठिकाणी पाहायला मिळते. काम झाल्यानंतर कोणीतरी नाष्टा देतो. कष्टकऱ्यांना दोन घास घालता हे दातृत्व दाखवताय त्यांचे मनापासून कौतुकआहे.’पवार म्हणाले, ‘हे कष्ट वाया जाणार नाही. पुढच्या पिढीसाठी केलेले योगदान चांगले आहे. कसंबसं पाणी मिळतंय. जनावरांनाही मिळावं म्हणून आपण सरकारशी बोलणार आहे. खासदार निधीतून दीड कोटी डिझेलसाठी आठ ते दहा दिवसांत पैसे पोहोचतील.’प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘या तालुक्यात सगळे लोक श्रमदान करत आहेत. कामानिमित्त बाहेर असणारी मंडळी, माहेरवाशीण, जावई काम करत आहेत. वॉटर कप स्पर्धेत तालुक्याचा सातत्याने नंबर येतो ही परंपरा यंदाही कायम ठेवू.’संजीवराजे म्हणाले, ‘जिल्हा परिषदेने कायम मदतीचा हात दिला आहे. बंधारा दुरुस्ती, गाळ काढणीची कामे असल्यास तातडीने तोडगा काढला जाईल.’गावांसाठी तीस टँकर‘माण, खटाव तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी रोहित पवार यांच्यातर्फे तीस टँकर पुरवण्यात येणार आहेत. हे टँकर पावसाळा सुरू होईपर्यंत मागणी होईल, त्या गावांना मोफत पाणीपुरवठा करतील,’ अशी माहितीही शरद पवार यांनी दिली.