शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

दराअभावी शेकडो ट्रक कांदा ऐरणीत पडून

By admin | Updated: August 29, 2016 00:03 IST

आठ रुपये दर : बदलत्या वातावरणामुळे कोंब येणे, पाणी शिरल्याने नासण्याचे प्रमाण वाढले

पुसेगाव : गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांदा पिकाच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे खटाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. अवघे आठ ते दहा रुपये दर निघाल्याने शेकडो ट्रक कांदा अद्यापही ऐरणीतच पडून आहे. बदलत्या वातावरणामुळे त्या कांद्याला कोंब येणे, पाणी शिरल्याने कांदा नासणे तसेच काजळी चढून रंग बदलत असल्याने ऐरणीतच सुमारे साठ टक्के कांदा बाद होत आहे. या परिसरात नाशिक गरवा कांद्याचे पाच महिन्यांचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. कमी भांडवलात जादा नफा मिळवून देणारे पीक असल्याने गेल्यावर्षी रब्बी हंगामात सर्रास शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली होती. गोर्टी कांद्यापासून बी तयार करून शेतकरी आपल्याच शेतात स्वत:साठी तसेच विक्रीसाठी कांद्याचे रोपे तयार करतात. साधारणत: दीड महिन्याचे रोप लागवडी योग्य झाल्यानंतर आॅक्टोबरमध्ये सोयीनुसार कांदा पिकाची लागवड केली जाते. गेल्यावर्षी खरिपासह रब्बी हंगामात पावसाने चांगलीच हुलकावणी दिली होती. तरीही उपलब्ध पाण्याच्या जोरावर या भागातील पुसेगाव, बुध, करंजओढा, फडतरवाडी, नेर, राजापूर, काटेवाडी, वेटणे, रणसिंगवाडी तसेच डिस्कळ, ललगुण, अनपटवाडी, शिंदेवाडी, नागनाथवाडी, जांब, जाखणगाव, विसापूर, पवारवाडी, वर्धनगड ही गावे कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्यावर्षी कांद्याला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी नव्याने कांदा लागवड करण्यासाठी एकरी १५ ते २० हजारांची रोपे विकत घेऊन एकरी ५ हजार रुपये दराने कांदा लागवड करणाऱ्या महिला मजुरांकडून लागवड केली. रासायनिक खते, आंतर मशागतीसाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला होता. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत थंडीचे प्रमाण तुलनेने कमीच राहिल्याने धुक्यामुळे कांद्यावर करपा रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे औषधांच्या तीन-चार फवारण्या करून शेतकरी वैतागला होता. त्यातच सर्वत्र विहिरींची पाण्याची पातळी कमालीची खोल गेलीय. (वार्ताहर)