शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

‘हॉर्न प्लीज’च्या हद्दपारीचा हजारोंचा संकल्प!

By admin | Updated: June 3, 2015 23:40 IST

‘उप प्रादेशिक परिवहन’चा उपक्रम : सायलेंट सिटीकडे साताऱ्याची वाटचाल ; ध्वनी प्रदुषणाला लगाम घालण्यासाठी १३ हजार वाहनधारकांचा पुढाकार

सातारा : एकेकाळी चालकांमध्ये हॉर्न वाजविण्याची जणू स्पर्धाच लागलेली असायची. परंतु अशा हॉर्नमुळे ध्नवीप्रदूषण किती होतेय यापेक्षा नागरिकांच्या आरोग्याचे काय, याचे कोणालाही देणेघेणे नसायचे. मात्र, सातारच्या उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाने एक पाऊल पुढे टाकून हॉर्न न वाजविण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली असून वाहन चालकांचे प्रबोधन करून त्यांना हॉर्न न वाजविण्यास परावृत्त करणे, त्यांच्याकडून संकल्प करून घेणे अशा प्रकारे या मोहिमेच्या माध्यमातून सातारा सिटी ही सायलंट सिटी करण्याचा निर्धार केला आहे. आत्तापर्यंत तब्बल १३ हजार वाहनचालकांनी या मोहिमेला समर्थन देऊन हॉर्न न वाजविण्याचा संकल्प केला आहे.पूर्वी नवीन गाडी घेतल्यानंतर चालक आपल्या वाहनाच्या पाठीमागे ‘हॉर्न प्लीज’ चा मजकूर लिहिण्यास विसरायचे नाहीत. आपण गाडी घेतली आहे, हे दाखविण्यासाठी काहीजण मुदमहून कर्कश आवाजाचे हॉर्न वाजवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. तर काहीजण वाटेत अडथळा ठरलेल्या व्यक्तीला अथवा वाहनाला बाजुला करण्यासाठी हॉर्न वाजतात. परंतु असे हॉर्न वाजविल्यामुळे ध्वनी प्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्यास अनेक घातक परिणाम होतात. हे माहित असूनही याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते.हॉर्न न वाजविणे हे आपल्याच हातात असते. जर प्रत्येकाने ठरवलं आम्ही हॉर्न वाजविणार नाही. तर यावर कारवाई करणे किंवा वाहन चालकांना सक्ती करण्याची गरजच पडणार नाही. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे संकल्प करून हॉर्न न वाजविण्याचा निर्णय घेतल्यास ध्वनी प्रदूषण टाळण्यास मदत होईल. तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याही दूर होतील, या सर्व गोष्टींचा विचार करून उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ही मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला. कोणावरही सक्ती न करता वाहन चालकांना हॉर्न वाजविण्याचे दुष्परिणाम व फायदे पटवून दिले जात आहेत.कार्यालयात आलेला चालक हॉर्न न वाजविण्याचा संकल्प करूनच बाहेर पडत आहे. एवढेच नव्हे तर कार्यालयात ठेवलेल्या नोंद वहीतही तो चालक आपले नाव आणि या मोहिमेला समर्थन असल्याचे नोंद करत आहे. आत्तापर्यंत तब्बल १३ हजार चालकांनी हॉर्न न वाजविण्याचा संकल्प केला आहे.मुंबई येथे केवळ एक दिवस हॉर्न वाजवू नका, अशी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली होती. परंतु एका दिवसात कोणी अशा सुधारणा करत नसते. त्यामुळे सातारच्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एक दिवसा ऐवजी कायमस्वरूपीच हॉर्न न वाजविण्याची संकल्पना पुढे आणली. या संकल्पनेला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. हा उपक्रम बहुदा महाराष्ट्रातील पहिलाच आहे. त्यामुळे उप प्रादेशिक कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी ‘हॉर्न प्लीज’च्या हद्दपारीसाठी झटून काम करत आहेत.जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून हॉर्नचे दुष्परिणाम सांगितले जात आहेत. नागरिकांनीही या मोहिमेमध्ये स्वत:हून सहभागी व्हावे. आपल्या आजूबाजुला असणाऱ्या व्यक्तीला हॉर्नमुळे त्रास होऊ नये, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. त्याहीपेक्षा वाहनांना हॉर्न न बसविणेच सोयीचे ठरेल.अशा सूचना देऊन वाहन चालकांमध्ये जनजागृती केली जात असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)स्वत:पासून करा सुरूवात..हॉर्न न वाजविण्याचा संकल्प प्रत्येकाने स्वत:पासून सुरू केला पाहिजे. त्यानंतरच दुसऱ्यांना हॉर्नचे दुष्परिणाम सांगावेत. हॉर्न विक्रीस ठेवणाऱ्या दुकानदारांनाही हॉर्न विक्रीस न ठेवण्याची विनंती करावी. आपल्या वाहनाला हॉर्न बसवू नयेत. अशा काही सूचना अंमलात आणल्यास सातारा सिटी सायलेट सिटी होण्यास वेळ लागणार नाही. हॉर्नचे दुष्परिणाम काय असतात. हे नागरिकांपर्यंत पोहोचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, हे समजून एक सामाजिक बांधिलकी म्हणून या मोहिमेचा प्रसार जास्तीत जास्त करावा, असे आवाहनही उप प्रादेशिक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.ध्वनी प्रदुषणामुळे बहिरेपणा आला तर ऐकण्याची क्षमता पुर्ववत होत नाही. शरीरावर घातक परिणाम होत असतात. प्रत्येकाने हॉर्न न वाजविण्याचा संकल्प करावा आणि इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे.-संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, साताराहॉर्न वाजविण्याचे दुष्परिणाममानसिक ताण उच्च रक्तदाबह्रदयरोगास आमंत्रण कायमचा बहिरेपणा वृद्ध, बालक, रूग्णांमध्ये घबराटधोकादायक ड्रायव्हिंगअपघातसदृश्य परिस्थितीहॉर्न न वाजविण्याचे फायदेअत्यंत सुरक्षित ड्रायव्हिंगसुरक्षित रस्ते प्रवास तणावमुक्त ड्रायव्हिंगवाहतुकीच्या नियमांचे पालननियंत्रित वेगमानसिक शांतता पर्यावरणाचे संवर्धन