शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

शंभर किलो फुलांच्या पायघड्या !

By admin | Updated: October 15, 2015 00:23 IST

नव्या नगराध्यक्षांसाठी अनोखे स्वागत : साताऱ्याच्या यंग ब्रिगेडने केली होती जय्यत तयारी

सातारा : पालिकेच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच नूतन नगराध्यक्ष विजय बडेकर यांचे त्यांच्या समर्थकांनी शाही पद्धतीने स्वागत केले. नगराध्यक्षांचे दालन आणि ज्या सभागृहात निवड झाली. त्या सभागृहापासून ते पालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत सगळीकडेच फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या. हा आगळावेगळा सोहळा पालिकेतील कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच अनुभवता आला. सुमारे १०० किलो फुलांच्या या पायघड्या होत्या. सातारा पालिकेमध्ये मनोमिलनाची सत्ता असल्याने दोन्ही आघाड्यांतून आपापल्या नगरसेवकांना पदे दिली जातात. काम करण्यास किती कालावधी मिळाला, यापेक्षा पद मिळालं, हे एखाद्या सर्वसामान्य नगरसेवकासाठी महत्त्वचं असतं. सातारा पालिकेमध्ये आजपर्यंत ४५ नगराध्यक्षहून गेले. पूर्वी पाच वर्षांचा काळ नगराध्यक्ष पूर्ण करत होते; परंतु मनोमिलनाची सत्ता २००६ रोजी आल्यानंतर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाचा सव्वा वर्षासाठी कार्यकाळ वाटून घेण्यात आला. मनोमिलनाच्या कालावधीत आत्तापर्यंत १२ जणांनी नगराध्यक्षपद भूषविले. सातारासारख्या ऐतिहासिक शहराचे नगराध्यक्षपद होणे हे अभिमानाची बाब आहे. त्यामुळे या पदासाठी नेहमीच रस्सीखेच होत असते. नगराध्यक्षपद मिळाल्यानंतर अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने जल्लोष करतात; परंतु नूतन नगराध्यक्ष बडेकर यांचे ज्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. ती पद्धत आत्तापर्यंत अवलंबली नव्हती. (प्रतिनिधी)पालिका झाली गुलालमय...नगराध्यक्षपदी विजय बडेकर तर उपनगराध्यक्षपदी जयवंत भोसले यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी पालिकेत प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीमध्ये विशेषत: तरुण मुले दिसत होती. बडेकर यांच्या स्वागतासाठी या मुलांनी शंभर किलो फुले आणली. संपूर्ण पालिकेमध्ये या फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. तितकाच गुलालही होता. गुलालाची उधळण केल्यामुळे पालिका गुलालमय झाली होती. नूतन नगराध्यक्षांचे हे आगळेवेगळे स्वागत पाहण्यासाठी सातारकरांनीही गर्दी केली होती. उपगनराध्यक्ष जयवंत भोसले यांच्या समर्थकांमध्येही यंग ब्रिगेडचा जत्था मोठा होता. उपनगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जयवंत भोसले यांना त्यांच्या दालनापासून ते गाडी ज्या ठिकाणी उभी होती तिथंपर्यंत खांद्यावर उचलून कार्यकर्त्यांनी नेले. इतका उत्साह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होता. खुर्चीवरून उठायचं नाही : उदयनराजे विजय बडेकर यांनी पद्भार स्वीकारल्यानंतर खासदार उदयनराजे यांनी ‘आता खुर्चीवर बसलात उठायचं नाही,’ असा सल्ला देत १९९१ च्या पालिका निवडणुकीची आठवण काढली. ते म्हणाले, ‘मी पालिकेत निवडून आलो, त्यावेळी विरोधात सहा नगरसेवक होते. तुम्ही आता नशीबवान आहात.’