शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

Lok Sabha Election 2019 माणूस संसदेत पाठवायचाय, टोलनाक्यावर नव्हे: मदन भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:11 IST

वाई : ‘आम्ही राजेंवर टीका करणार नाही ते माझे मित्र आहेत; परंतु ही लोकसभेची निवडणूक संसदेत माणूस पाठविण्यासाठीची असून, ...

वाई : ‘आम्ही राजेंवर टीका करणार नाही ते माझे मित्र आहेत; परंतु ही लोकसभेची निवडणूक संसदेत माणूस पाठविण्यासाठीची असून, टोल नाक्यावर पाठवायचा नाही. आता घाबरण्याचे दिवस संपले आहेत. आमचा उपयोग करून घ्या; पण आमच्या चार पावले पुढे तुम्ही राहिले पाहिजे. आमचे परतीचे दोर केव्हाच कापले आहेत. आम्हाला भविष्याची चिंता नाही,’ असा हल्लाबोल किसन वीर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार मदन भोसले यांनी केला.सातारा येथील औद्योगिक वसाहतीत उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, किसनवीर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उपाध्यक्ष काशिनाथ शेलार, अविनाश फरांदे, महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महेश शिंदे, तालुकाध्यक्ष अनिल शेंडे, भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन घाटगे, महिला जिल्हाप्रमुख शारदाताई जाधव, महाबळेश्वर नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, वाईच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, रोहिदास पिसाळ, नंदकुमार खामकर, वाई अर्बन बँकेचे चेअरमन चंद्र्रकांत काळे उपस्थित होते.चरेगावकर म्हणाले, ‘भाजपाचा धसका घेतल्यानेच विरोधक एकत्र आले आहेत. शरद पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. सांगलीच्या मत्रपत्रिकेतून काँग्रेसचे चिन्ह गायब झाले. त्यांना उमेदवार मिळत नाहीत आणि हे देश चालविण्याची स्वप्ने पाहतात. काँग्रेसचा स्वत:चे अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. शेतीतील जाणकार समजणाऱ्यांनी साखर उद्योग वाचविण्यासाठी इथेनॉल प्रकल्प का आणले नाहीत, साखरेस व शेत मालाला हमीभाव का दिला नाही? याची उत्तरे द्यावीत. यांच्या काळात दहा वर्षे शेतमालाला हमीभाव देणारा स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट दाबून ठेवला. याचं उत्तर विरोधकांनी द्यायलाच हवं.’यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, यशवंत लेले, महेश शिंदे, हणमंतराव वाघ, मंगेश खंडागळे, दिलीप वाडकर, अजित वनारसे, संतोष कोळेकर, अविनाश फरांदे, शारदाताई जाधव, काशिनाथ शेलार, यशवंत घाडगे, अनुप सूर्यवंशी आदींनी मनोगते व्यक्त केली. यामुळे नेत्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक