साळशिरंबे, ता. कऱ्हाड ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गट व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर गट यांनी एकत्र निवडणूक लढवली. त्यामध्ये निर्विवाद वर्चस्व मिळवत सर्वच्या सर्व नऊ जागा जिंकल्या. विजयी उमेदवारांसह गावातील प्रमुखांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, साळशिरंबे ग्रामस्थांनी पहिल्यापासूनच काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यावर प्रेम करणारे हे गाव आहे. माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात गावातील रस्त्यांसह सभामंडप, विद्युत पुरवठा, शेतीच्या पाण्यासाठी बंधारे अशी काही विकासकामे मार्गी लागली आहेत. यापुढच्या काळातही गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करताना निधीची कमतरता भासू देणार नाही. त्यासाठी नेत्यांनी गावाच्या विकासाचा आराखडा तयार करून तो सादर करावा. त्याला निधी दिला जाईल.
यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य विशाल पाटील, अभिजित चवरे, अशोक साठे, सद्दाम मुल्ला, अभिजित चवरे, सुनंदा मोहिते, अपर्णा मोहिते, स्मिता देशमुख, अमृता चोपडे यांचा सत्कार करण्यात आला. पंचायत समितीचे माजी सदस्य तुकाराम पाटील, कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे प्रवक्ते पै. तानाजी चवरे, माजी सरपंच रवींद्र ऊर्फ तात्यासाहेब पाटील, सुरेश पाटील, जालिंदर देशमुख, धनाजी पाटील, रंगराव देशमुख, सुनील चवरे, एम. डी. पाटील, रमेश पाटील, उत्तम पाटील, अमोल पाटील, शक्कुर मुल्ला, दत्तात्रय जाधव, आदी उपस्थित होते.
फोटो : ०३केआरडी०४
कॅप्शन : साळशिरंबे, ता. कऱ्हाड येथील नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.