शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

धरणे अर्धवट ठेवणारे शेतकऱ्यांचे कैवारी कसे?

By admin | Updated: August 30, 2015 21:55 IST

चंद्रकांत पाटील : पिंपोडे बुद्रुक येथील बंधाऱ्याच्या जलपूजनप्रसंगी आघाडी सरकारवर घणाघात

वाठारस्टेशन : ‘आघाडी सरकारच्या कृतिशून्य कारभारामुळे सध्याची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक वर्षे सत्ता असूनही धरणांची कामे अर्धवट ठेवणारे शेतकऱ्यांचे कैवारी कसे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करत कुठलाही स्वाभिमानी शेतकरी कर्जमाफी मिळावी, असे म्हणणार नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना पाणी मिळवून देऊन स्वत:च्या पायावर उभे करू.’ असे प्रतिपादन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथील वसना नदीवरील ब्रिटिशकालीन बंधाऱ्याचे जलपूजन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, जलतज्ज्ञ डॉ. अविनाश पोळ, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, तालुकाध्यक्ष दीपक पिसाळ, रा. स्व. संघांचे जिल्हा संघटक डॉ. सुभाष बर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री पाटील म्हणाले, शेतकरी हा साखर कारखान्यांचा गुलाम होता; पण युती शासन सत्तेवर येताच १९९५ मध्ये शेतकऱ्याच्या पायातील बेडी काढून साखर उद्योगावरील झोनबंदी उठवण्याचा धाडसी निर्णय युती शासनाने घेतला. चालूवर्षी उद्योग अडचणीत आल्यानंतर ८७० कोटींचा साखर कारखान्यांचा खरेदीकर माफ केला. केंद्र सरकारचे ४ हजार व राज्य सरकारचे १ हजार असे ५ हजार कोटींचे अनुदान प्रतिटन निर्यातीसाठी दिले. ६५०० कोटींचे बिनव्याजी कर्ज कारखान्यांना देऊन शेतकऱ्यांच्या उसाला दर देण्याचा प्रयत्न केला. आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लावून कायमस्वरूपी अपंग करण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही स्वाभिमानी शेतकऱ्याला कर्जमाफी व्हावी, असे वाटणार नाही. यासाठी २५ हजार कोटींची तरतूद फक्त शेतकऱ्यांसाठी करणार आहोत. यातील साडेसतरा हजार कोटी हे सोलर कृषिपंपासाठी खर्च करणार आहोत.’जिल्हाधिकारी म्हणाले, पूर्वीच्या कामांची दुरुस्ती केल्यास कमी खर्चात व कमी वेळेत दर्जेदार कामे साकारता येतील, यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे.’ यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील, डॉ. अविनाश पोळ, माजी सरपंच विकास साळुंखे, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले.विजयराव पंडित यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास बाळासाहेब दामले, जिल्हा परिषद सदस्य सतीश धुमाळ, छत्रपती संभाजी पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे, सुरेशराव साळुंखे, राजेश निकम, लालासाहेब निकम, सूर्यकांत निकम, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)पाच वर्षांत ३० हजार गावे जलयुक्त करण्याचे उद्दिष्ट ‘चालूवर्षी राज्यातील साडेसहा हजार गावे जलयुक्त शिवार अभियानात घेतली. यात सातारा जिल्ह्यातील २१५ गावांचा समावेश आहे. ३,१०२ कामांपैकी यंदा २००० कामे पूर्ण झाली आहेत. येत्या पाच वर्षांत राज्यात ३० हजार गावे जलयुक्त करण्याचे उद्दिष्ट या सरकारने ठेवले असून, एकही गाव ‘जलयुक्त’मधून वंचित राहणार नाही,’ असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केले. ते म्हणाले ‘शेतकऱ्याला २४ तास वीज उपलब्ध होईल. तसेच वीजबिलाचा प्रश्नही राहणार नाही. हे सोलर पंप कमी व्याजदरात व ६० टक्के राज्यशासन अनुदानावर वितरित करणार आहे. यामुळे आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी न देता स्वाभिमानी बनविण्याचे काम आगामी पाच वर्षांत करणार आहोत.’