शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आपण आतून कसे आहोत हे महत्त्वाचे--स्वाती महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 22:06 IST

सातारा : ‘आपण बाहेर कसे दिसतो, याहीपेक्षा आतून कसे आहोत, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रस्थापित समाजव्यवस्थेला का विचारण्याची धमक मुलींमध्ये निर्माण झाली पाहिजे,

ठळक मुद्देयशवंतराव चव्हाण समाज कार्य महाविद्यालयात मुक्त संवादमला माझ्यातील अनेक नवे पैलू अनुभवायला आणि पाहायला मिळालेप्रशिक्षणासाठी मी त्याच्यापासून दीड वर्ष लांब राहिले.

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘आपण बाहेर कसे दिसतो, याहीपेक्षा आतून कसे आहोत, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रस्थापित समाजव्यवस्थेला का विचारण्याची धमक मुलींमध्ये निर्माण झाली पाहिजे,’ अशी अपेक्षा लेफ्टनंट स्वाती महाडिक यांनी व्यक्त केली.

जकातवाडी, ता. सातारा येथील यशवंतराव चव्हाण समाज कार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद कार्यक्रमात लेफ्टनंट महाडिक यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्या म्हणाल्या, ‘प्रशिक्षण काळात केस कापल्यामुळे तुम्हाला कसे वाटले, याविषयी मला अनेक विद्यार्थिनींनी प्रश्न विचारला. आपण कसे दिसतो, याहीपेक्षा आपण कोणते कार्यकर्तृत्व सिद्ध करतो हे जास्त महत्त्वाचे आहे. सामाजिक कार्यकर्ती, शिक्षिका ते लेफ्टनंट या प्रवासात मला माझ्यातील अनेक नवे पैलू अनुभवायला आणि पाहायला मिळाले. जिद्दी आणि वेगळं करून दाखवण्याची धमक या दोन गोष्टीच भविष्यात उपयोगाला येणार आहेत.’लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची मुलाखत किशोर काळोखे यांनी घेतली. यावेळी लक्ष्मण माने, भाई माने, समजा जीवन आदी मान्यवर उपस्थित होते.आई आपणच घरीच राहूकर्नल संतोष महाडिक यांना वीर मरण आले तेव्हा स्वराज अगदीच न कळत्या वयाचा होता. त्यामुळे त्याला त्याचे वडील पूर्णपणे आठवत नाहीत. पण सैन्याच्या प्रशिक्षणासाठी मी त्याच्यापासून दीड वर्ष लांब राहिले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता मी घरी आले आहे.पण स्वराजला घर सोडून कुठेही बाहेर जायला नको वाटते. ‘आई आता कुठेही फिरायला जायचं नाही, आपण आपल्या घरातच राहायचं’ त्याचं हे वाक्य त्याच्या आयुष्यातील आमची कमी अधोरेखित करत असल्याचे भावनिक होऊन लेफ्टनंट महाडिक यांनी सांगितले.