शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

शिक्षणाला भरला पैसा, नोकरीसाठी आणावा कसा?

By admin | Updated: December 11, 2014 23:49 IST

नवशिक्षकांची दशा : नोकरी मिळेना म्हणून शिकवण्या घेण्याची वेळ--हतबल गुरुजींचानिबंध - तीन

प्रदीप यादव -सातारा  --शिक्षकाची नोकरी म्हणजे समाजात मान, प्रतिष्ठा. आई-वडिलांनी मोलमजुरी करून, पोटाला चिमटा काढून जमविलेली पै-पै शिक्षक बनविण्यासाठी खर्ची घातली. चांगल्या मार्कांनी शिक्षणशास्त्राची पदवी मिळविली; पण चांगल्या गुणांचे वजन चालत नाही काही संस्थांना. अनुदान नसल्याने फक्त ‘अर्थ’पूर्ण व्यवहारच कळतो. शिक्षणासाठी पैसे भरले, आता पुन्हा नोकरीसाठी आणायचे कुठून? नोकरीची वाट तरी किती बघायची? पोट भरण्यासाठी शिकवण्या घेण्यावाचून दुसरे करू तरी काय शकतो, ही स्थिती आहे नवशिक्षकांची.शिक्षक बनविण्याऱ्या कारखान्यांतून दरवर्षी नवशिक्षकांचे लोंढे बाहेर पडत आहेत. त्यांना नोकरी देणे, हे शासनाचे काम आहे. पण एवढ्या उमेदवारांना एकाच वेळी नोकरीत सामावून घेणे अशक्य असल्याने उमेदवारांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत आहे. वाट पाहून अनेकांचे नोकरीचे वय निघून गेले तर अनेकांनी नोकरीची अपेक्षा सोडून दुसऱ्याच्या बांधावर मजुरी करण्याचे काम पत्करल्याची उदाहरणे पाहायला मिळत आहेत. आई-वडिलांनी काबाडकष्ट करून शिक्षक बनविले खरे; पण नोकरीच मिळत नसल्यामुळे अनेकांनी स्वत:च्या खासगी शिकवण्या सुरू केल्या आहेत. तर काही जण शहरातल्या क्लासेसमध्ये दोन-चार हजारांवर नोकरी करत आहेत. शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त असल्या तरी वर्षानुवर्षे त्या भरल्या जात नाहीत. त्यामुळे या जागा कधी भरणार याकडे अनेकांचे लक्ष असते.त्या-त्या प्रवर्गाचा उमेदवार मिळत नाही म्हणून जागा रिक्त असल्याचे सांगितले जाते. मात्र, अनेक शिक्षण संस्थांमध्ये अनुशेष भरला नसल्यामुळे कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना जादा काम करावे लागते तर दुसरीकडे दरवर्षी शिक्षणशास्त्राच्या पदव्या घेऊन बाहेर पडणाऱ्यांना नोकरी मिळत नाही, असा विरोधाभासही पाहावयास मिळतो. ‘अर्थ’कारण हेच यामागचे कारण असल्याने नवशिक्षकांवर शिकवण्या घेण्याची वेळ आली आहे. खासगी शिकवण्यांचे पेवशहरी आणि ग्रामीण भागातही खासगी शिकवण्यांचे पेव वाढले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिक्षणशास्त्राची पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या हजारोंच्या पटीत आहे. शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण झाल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना नोकरी मिळणे कठीण झाले आहे. साहजिकच शिकवणीच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम करताना दिसतात. ज्याच्याकडे पैसा त्यालाच नोकरीशिक्षक बनण्यासाठीही आता ऐपत असावी लागते. पैसे भरण्याची ऐपत असेल त्यालाच आता नोकरी मिळते, ही वस्तुस्थिती आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी शिक्षक होण्याचे दिवस आता संपले. कारण लोखो रुपये डोनेशन म्हणून दिल्यानंतरच एखाद्या शिक्षण संस्थेत नोकरीला चिकटवता येतं, असा विचार आता रुढ होत आहे.