शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शेतात बांधलेल्या घरांचा आता गावठाणामध्ये समावेश जिल्हा प्रारूप आराखडा : कृषी क्षेत्रावर बांधलेल्या घरांच्या जागांना ‘एनए’ची गरज नाही; बॅँकांकडून कर्ज मिळण्यास सुलभता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:15 IST

सातारा : राज्य शासनाने अंतिम केलेल्या जिल्हा प्रारूप आराखड्यामुळे अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. गावठाणाची हद्द वाढल्याने गावकुसाबाहेर शेतांमध्ये घरे

सातारा : राज्य शासनाने अंतिम केलेल्या जिल्हा प्रारूप आराखड्यामुळे अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. गावठाणाची हद्द वाढल्याने गावकुसाबाहेर शेतांमध्ये घरे बांधून राहणाºया लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही घरेही आता अधिकृत ठरणार आहेत.

गावठाण वगळता इतर भाग कृषी क्षेत्र म्हणून संबोधला जातो. मूळ गावठाणात बांधकाम करायचे झाल्यास संबंधित ग्रामपंचायतीकडून बांधकाम परवाना घेऊन कामाला सुरुवात करणे शक्य असते.गृहकर्ज काढून बांधकाम करायचे झाल्यास त्यालाही जमीन कलेक्टर ‘एनए’ पाहिजे, हा निकष असतो. साहजिकच शेतात घर बांधायचे झाल्यास ‘एनए’ नसेल तर बँका कर्जही देत नाहीत. दिवसेंदिवस कुटुंबाचा विस्तार होत असतो. या विस्तारित कुटुंबाच्या रहिवासाचाप्रश्न निर्माण होतो, तेव्हा गावठाणाशेजारी असणाºया शेतजमिनींवर घरे बांधण्याचा विचार ग्रामीण भागात केला जातो; परंतु मर्यादित गावठाणामुळे अनेकांची पंचाईत होते. तसेच छोटेखानी शेतघर बांधून लोक राहतात, अशी परिस्थिती आहे.

राज्य शासनाने मंजूर केलेल्या सातारा जिल्ह्याच्या प्रारूप आराखड्यामध्ये गावठाणांबाबत काही महत्त्वाची बाबी निर्देशित केल्या आहेत. त्यामध्ये ५ हजार लोकसंख्या असणाºया गावातील गावठाण ५०० मीटर, ५ ते १० हजार लोकसंख्येच्या गावातील गावठाण ७५० मीटर, १० हजारांपेक्षा जास्त गावांचे गावठाण १ हजार मीटर तसेच इको सेन्सिटिव्ह झोनमधील गावठाण २०० मीटर इतके करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात असणाºया गावठाणाच्या हद्दीची लांबी वाढणार असून, संपूर्ण परीघ व्यापणार असल्याने त्या ठिकाणी सध्या असणाºया रहिवाशांचे प्रश्न सुटले आहेत. घरांच्या नोंदी, कर वसुली, सोयीसुविधा संबंधित ग्रामपंचायतीने पुरविणे शक्य होईल, तसेच ज्यांना बँका कर्ज देत नव्हत्या किमान त्यांची कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.जमीन व्यवहार करताना रेडिरेकनरनुसार ३० टक्के शुल्क शासकीय यंत्रणेकडे भरायला लागत होते. हे शुल्क निम्म्यावर आणण्याचा दिलासादायक निर्णय झाला असल्याने शेतजमीन घेणाºयांनाही दिलासा मिळणार असून, जागांचे व्यवहार वेगाने होण्यास मदतहोणार आहे. तसेच शासकीय जागांवर केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जी बांधकामे होतात, त्यासाठी कोणतेही शुल्क भरण्याची गरज पडणार नाही.

जिल्ह्यातील राखीव क्षेत्राबाबतचा प्रस्ताव फेटाळण्यात आला असून, त्याबाबतचे सर्व अधिकार पुणे विभागाचे टाऊन प्लानिंग संचालकांना देण्यात आले आहेत. पर्यावरणाचा विचार करूनच याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.प्रस्तावित असणारे रिंगरोड व बायपास रस्ते यांच्या रचनेत बदल करता येणार नाहीत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग सर्व्हे करून जो आराखडा तयार करेल, तोच जिल्हा प्रारूप आराखड्याचा भाग असेल, असे आराखड्यात नोंद करण्यात आले आहे. जो भाग नो डेव्हलपमेंट झोन आहे, त्यावर फार्म हाऊसही बांधण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

महाबळेश्वर, पाचगणी या शहरांच्या ५० मीटर परिसरात समुद्रसपाटीपासून १ हजार उंचीच्यावर बांधकामाला बंदी घातली गेली आहे. रिसोर्टचे बांधकाम करताना पर्यावरणाचे निकष पाळण्याची सक्ती आहे. प्लास्टिकचा कमीत कमी वापर करावा, उपलब्ध होणारे प्लास्टिकच पुनर्वापर करण्याचे सूचविण्यात आले आहे.ग्रामीण केंद्रांना मंजुरी नाकारलीजिल्हा प्रारूप आराखडा तयार करताना पुसेसावळी, पुसेगाव, औंध (ता. खटाव), गोंदवले (ता. माण), मल्हारपेठ (ता. पाटण), कुडाळ (ता. जावळी) या पाच मोठ्या गावांमध्ये ग्रामीण विकास केंद्रांची उभारणी प्रस्तावित करण्यात आली होती; परंतु शासनाने फेटाळली आहे.शेतात मंगल कार्यालय...मंगल कार्यालयासारखी वास्तू उभारायची झाल्यास पूर्वी ते शक्य होत नव्हते, आता मात्र एखाद्याला शेतात मंगल कार्यालय उभारायचे झाल्यास त्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. मात्र या मंगल कार्यालयाच्या समोरून किमान १५ चा रस्ता असणे आवश्यक आहे.देशी झाडे लावण्याची सक्तीरिसोर्ट अथवा पर्यटन केंद्रांची उभारणी करत असताना विदेशी झाडे लावण्यास बंदी घालण्यात आलीआहे.संबंधित मालकांनी केवळ देशी झाडांची लागवड करावी, तसेच पर्यावरणाचे जतन करण्यासाठी ज्या काही उपाययोजना गरजेच्या आहेत, त्या करणे सक्तीचे करण्यात आले.