शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा ठेकेदाराला घरकुलांचे काम

By admin | Updated: June 13, 2015 00:13 IST

महापालिकेचा प्रताप : बांधकाम विभागाचे काम रामभरोसे, ठेकेदारांवर मेहेरनजर--लूट पालिका तिजोरीची-४

शीतल पाटील - सांगली -एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत महापालिका हद्दीत राबविल्या जात असलेल्या घरकुलांचे काम पाणीपुरवठा विभागाची कामे करणाऱ्या ठेकेदाराला देण्याचा प्रताप महापालिकेच्या बांधकाम विभागाने केला आहे. २०१२-१३ च्या लेखापरीक्षणात याबाबत गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. या लेखापरीक्षणात सर्वाधिक आक्षेप बांधकाम विभागावर असूून रस्ते, गटारी, पेव्हिंग, घरकुल योजना, उद्यान विकासासह सर्वच ठेकेदारांना पोसण्याचेच काम केल्याचे दिसून येते. सांगली महापालिका क्षेत्र झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने ९३.८८ कोटीच्या घरकुल योजनेला मान्यता दिली. या प्रकल्पात महापालिकेच्या मालकीच्या पाच व शासन मालकीच्या दोन अशा सात झोपडपट्ट्यांच्या जागेवर ३७९८ झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव आहे. या कामासाठी ९.६३ टक्के जादा दराची निविदा स्ट्रेसकिट इंडिया लिमिटेड यांच्या नावे मंजूर करण्यात आली. पण झोपडपट्टीधारकांनी बैठ्या घरांची मागणी केल्याने व न्यायालयाने स्थगिती दिल्याने काम सुरू होण्यास दीड वर्षाचा विलंब झाला. त्यात पुन्हा काम सुरू करताना ठेकेदाराने जागा दराची मागणी केल्याने त्याची निविदा रद्द करण्यात आली. यापैकी मिरज येथील इंदिरानगर झोपडपट्टीतील ६८२ घरकुलांच्या कामाबाबत लेखापरीक्षकांनी आक्षेप घेतला आहे. इंदिरानगर घरकुलांच्या ठेकेदाराला यापूर्वीच संजयनगर येथील ४३८ घरकुलांचे काम दिले होते. या ठेकेदाराला थेट पद्धतीने काम देण्यात आले. ठेकेदाराच्या कागदपत्रांची छाननी केली असता, म्हाडा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे नोंदणी प्रमाणपत्र नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्णयानुसार वर्ग ‘अ’मधील ठेकेदाराला कामाची मर्यादा नाही. ब वर्गासाठी २५ कोटी, तर क वर्गासाठी १५ कोटीची मर्यादा आहे. या ठेकेदाराचे नोंदणी प्रमाणपत्र नसल्याने त्याची वित्तीय स्थिती, बांधकाम विभागात यापूर्वी किती रकमेची कामे केली, याची माहिती लेखापरीक्षकांना समजू शकलेली नाही. या ठेकेदाराचा अनुभव दाखला पाहता, त्याने बांधकाम विभागाची कामे न करता पाणीपुरवठा विभागाची कामे केल्याचे आणि विहित अर्हता प्राप्त नसलेल्या ठेकेदाराला घरकुलाचे काम दिल्याचे अहवालात नमूद केले आहे. घरकुलांच्या निविदा अटी शर्तीमध्ये ठेकेदाराला अ‍ॅडव्हान्स (आगाऊ रक्कम) देण्याची तरतूद नसतानाही महापालिकेने ठेकेदाराला ३२ लाख २७ हजार रुपये दिले. त्यापोटीची १० टक्के व्याजाची रक्कम कपात केलेली नाही. त्यामुळे लेखापरीक्षकांनी ३ लाख २२ हजार वसूलपात्र रक्कम निश्चित केली आहे. इंदिरानगर घरकुलाची जागा ताब्यात नसताना प्रकल्प राबविल्याने महापालिकेवर वाढीव खर्चाचा बोजा पडला आहे. या खर्चाची तरतूद अंदाजपत्रकात केली नाही. त्यात ठेकेदाराची बिले केंद्र शासनाच्या निधीतून खर्ची टाकण्यात आली. त्यामुळे वित्तीय अनियमिततेमुळे महापालिकेच्या दायित्वात वाढ होऊन प्रकल्पाची प्रगती रेंगाळल्याचा ठपकाही लेखापरीक्षकांनी ठेवला आहे. सर्वाधिक आक्षेप लेखापरीक्षणात सर्वाधिक आक्षेप बांधकाम विभागावर घेण्यात आले आहेत. विविध कामांत ठेकेदारांकडील रॉयल्टी वसूल न केल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडल्याचेही स्पष्ट म्हटले आहे. दलित वस्ती, शासन निधी, खासदार निधी, विशेष अर्थसहाय्य यामधील रस्ते डांबरीकरण, गटारी, पेव्हिंगच्या कामावर गंभीर ताशेरे ओढले आहेत. ठेकेदाराला पोसण्यात तरबेज असलेल्या बांधकाम विभागाच्या कारभाराचा लेखापरीक्षकांनी पर्दाफाश केला आहे.