शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड, सातारमधील घरफोड्या उघडकीस

By admin | Updated: April 12, 2016 00:41 IST

तिघांना कोल्हापुरात अटक : चैनीसाठी चोऱ्या; दोन लाखांचा माल जप्त

कोल्हापूर : कोल्हापुरात एटीएम फोडण्यासाठी जाताना दसरा चौकात दोघांना सोमवारी राजारामपुरी पोलिसांनी पकडले तर तिसऱ्या साथीदाराला साताऱ्यातून अशा तिघांना अटक केली. अटक केलेले दोघे सांगली जिल्'ातील तर एक सातारा जिल्'ातील आहे. या तिघांकडून सोने, चांदीचे दागिने, कॅमेरा, मोबाईल असा सुमारे दोन लाखांचा माल जप्त केला.या घरफोडीचा म्होरक्या लक्ष्मीकांत ऊर्फ सचिन इटकरकर (वय २०, रा. शाहूनगरी दुसरी गल्ली, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली), शुभम महादेव पोळ (१९ नागाव, ता. वाळवा, जि. सांगली) व अक्षय अशोक शिंदे (२० मूळ गाव कुडाळ ता. जावळी, जि. सातारा, सध्या राहणार पशुवैद्यकीय दवाखाना निवासस्थान गोडोली ता. सातारा, जि. सातारा) असे अटक केलेल्या संशयित चोरट्यांची नावे आहेत. या तिघांनी कऱ्हाड व सातारा या दोन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.अमृत देशमुख म्हणाले, शहरातील एका ठिकाणचे एटीएम फोडण्यासाठी दोन तरुण जाणार असल्याची व ते दोन तरुण दसरा चौकात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दसरा चौकात टेहळणी सुरू केली. त्यावेळी दोन तरुण या चौकातील एका कठड्यावर बसले होते. पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यातील एकाने लक्ष्मीकांत इटकरकर व दुसऱ्याने शुभम पोळ आपले नाव असल्याचे सांगितले. या दोघांना ताब्यात घेऊन राजारामपुरी पोलिस ठाण्यात आणले. त्यांनी कऱ्हाड व साताऱ्यामध्ये दोन ठिकाणी घरफोडी केल्याचे चौकशीत सांगितले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता तिसरा साथीदार अक्षय शिंदे हाही घरफोडीमध्ये सहभागी असल्याचे या दोघांनी सांगितले. त्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी सातारा येथून अक्षय शिंदेला ताब्यात घेऊन कोल्हापूरला सायंकाळी आणले.या तिघांनी कऱ्हाड येथील विद्यानगरमधील राहणारे सागर सर्जेराव कदम यांच्या घरी दि. १७ फेबु्रवारी २०१५ मध्ये बंद बंगल्यामध्ये पाठीमागील बाजूच्या दरवाज्यातून प्रवेश करून त्यांच्या घरातील सोने व चांदीचे दागिने, एक कॅमेरा, मोबाईल व इतर कागदपत्रे असा सुमारे एक लाख ६१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर दि. २४ नोव्हेंबर २०१४ ला सातारा येथील सदर बाजार याठिकाणी राहणारे प्रदीपकुमार गणपतराव शिंदे यांच्या घरातून सोन्याचे गंठण असा सुमारे ६५ हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला. कऱ्हाडमधील चोरीचा माल इस्लामपुरातील मित्र गणेश पाटोळे याला विकला व साताऱ्यामधील चोरलेले सोन्याचे गंठण अल्फास शेख या इसमास विक्री केले असल्याची कबुली या तिघांनी दिली. या तिघांना सोमवारी रात्री उशिरा राजारामपुरी पोलिसांनी कऱ्हाड पोलिसांच्या स्वाधीन केले.ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक आण्णाप्पा कांबळे, सहाय्यक फौजदार राजू वरक, पोलिस हवालदार इकबाल महात, किरण गवळी, अशोक पाटील, मिलिंद नलवडे, राजेश होळी, सागर साळुंखे, युवराज पाटील, गौरव चौगुले, निवास पाटील, पोलिस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर केदार, अमोल अवघडे, महिला पोलिस कॉन्स्टेबल अर्चना जाधव, समीना मुल्ला यांनी केली.