शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बनगरवाडीत हॉटस्पॉट; आतापर्यंत २४ जण बाधित...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 19:23 IST

CoroanVirus Satara- माण तालुक्यातील बनगरवाडीत सोमवार-मंगळवार दोन दिवस केलेल्या तपासणी अहवालात १७ ग्रामस्थ कोरोना बाधित आढळल्याने मागील पंधरा दिवसांपासून सापडलेल्या एकूण कोरोनाबाधित ग्रामस्थांची संख्या २४ च्या वर जाऊन पोहोचल्याने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देबनगरवाडीत हॉटस्पॉट; आतापर्यंत २४ जण बाधित, परिसरात खळबळ दोन दिवसांत १७ बाधित आढळल्याने नागरिकांमध्ये भीती

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील बनगरवाडीत सोमवार-मंगळवार दोन दिवस केलेल्या तपासणी अहवालात १७ ग्रामस्थ कोरोना बाधित आढळल्याने मागील पंधरा दिवसांपासून सापडलेल्या एकूण कोरोनाबाधित ग्रामस्थांची संख्या २४ च्या वर जाऊन पोहोचल्याने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

त्यामुळे प्रशासनाने गावात कडक निर्बंध लागू केले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीच्यावतीने औषध फवारणी करण्यात आली असून, वेळेचे निर्बंध न पाळणाऱ्या दुकानदारांना आणि मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरपंच रंजना बनगर व ग्रामसेवक शिवयोगी वंजारी यांनी केले आहे.

मागील महिन्यात बनगरवाडीतील एका दुकानदाराचा अहवाल बाधित आला होता. तर गावातील ग्रामस्थ काही दिवसांपूर्वी लग्न समारंभासाठी धुळदेव या ठिकाणी गेले होते. तर आठवड्यापूर्वी मुंबई-पुण्यावरून काही बाधित ग्रामस्थ येऊन, गुपचूप खासगी डॉक्टरांकडून घरीच उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यानंतर चार-पाच दिवसांनी गावातील अनेकांना अंगदुखी, सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली असता तेराजण बाधित असल्याचे समोर आले. त्यानंतर सोमवार-मंगळवार दि. १९ व २० रोजी पुळकोटी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता, दोन दिवसांत १७ जण बाधित असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आल्याने घरीच त्यांना आयसोलेशन करून औषधोपचार सुरू केले आहेत.  यामुळे बनगरवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर