शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जंबो कोविडमध्ये रुग्णांचा पाहुणचार ठरतोय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जंबो कोरोना सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांचा त्यांच्या नातेवाईकांकडून होणारा पाहुणचार सध्या कर्मचाऱ्यांची डोकेदुखी बनू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जंबो कोरोना सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांचा त्यांच्या नातेवाईकांकडून होणारा पाहुणचार सध्या कर्मचाऱ्यांची डोकेदुखी बनू लागला आहे. चहा, नाष्ट्यासह जेवणाची सोय असलेल्या या सेंटरमध्ये नातेवाईक प्लास्टिकच्या पिशव्या आणि कंटेनरमध्ये चहा, नाष्टा आणि जेवण देत आहेत. प्रत्येकाला वेगवेगळी सोय देताना या कर्मचाऱ्यांची अक्षरश: दमछाक होत आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराची सर्वोत्तम सोय असणाऱ्या सातारा जंबो कोविड सेंटरमध्ये शासनाकडून विनामूल्य चहा, नाष्टा आणि जेवणाची सोय केली जाते. मात्र कोणाला येथील अन्नाची चव पसंत पडेना, तर काहींना घरच्या जेवणाची आठवण येऊ लागल्याने ही पार्सल सुविधा नातेवाईकांनी सुरू केली आहे. कोविड रुग्णालयातील भांडे आपल्या घरी आणायला नको म्हणून यूज अ‍ॅण्ड थ्रो कंटेनरमधून नातेवाईक पार्सल पोहोच करत आहेत. दिवसातून तीनदा नातेवाईकांची ही सेवा करता कर्मचारी वैतागले आहेत.

कोविड काळात आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी कुटुंबियांना सेंटरमध्ये बोलावून त्यांना संकटात टाकण्याची दाखल रुग्णांची वृत्ती जशी चुकीची आहे, तसेच काही दिवस सहन करा, घरी आला की वाट्टेल ते खावा, हे ठणकावून सांगण्यात कुटुंबीयही कमी पडत आहेत. परिणामी सेंटरमधील कर्मचाऱ्यांच्या हातापाया पडून हे अन्न रुग्णांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. एकच काम वारंवार करावे लागत असल्यामुळे हे कर्मचारीही अक्षरश: वैतागले आहेत.

चौकट :

प्लास्टिक पिशव्यांतून चहा अन् नाष्टाही

जंबो कोविड सेंटरमध्ये खाण्या-पिण्याचे पदार्थ देताना ते प्लास्टिकच्या पिशव्यांतून देण्याकडे नातेवाईकांचा कल आहे. चहा आणि कॉफीसुध्दा प्लास्टिकच्या पिशवीत बांधून देण्यात येते. अनेकदा एकसारख्या पिशव्या असल्यामुळे कोणती पिशवी कोणाची, हेही समजून येत नाही. यावर उतारा म्हणून काही नातेवाईकांनी पिशव्यांवर नाव टाकून देण्याचाही प्रयोग अवलंबला आहे.

पॉईंटर :

जंबो सेंटरमधील जेवणाची व्यवस्था

सकाळी ७ वाजता चहा-नाष्टा

दुपारी १२ वाजता जेवण

संध्याकाळी ४ वाजता चहा

रात्री ८ वाजता जेवण

कोट :

जंबो कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना चहा, नाष्टा आणि जेवण विनामूल्य पुरवले जाते. प्लास्टिक पिशव्यांचा अमर्याद वापर पाहता, प्रशासनाने प्लास्टिक पिशव्या आणणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, जेणेकरून अशा गोष्टींना आळा बसेल.

- प्रशांत मोदी, सामाजिक कार्यकर्ते