शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘हिंदी’ भाषेची चलती कºहाड अन् फलटणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राष्ट्रीय भाषा म्हणून गौरविण्यात आलेल्या हिंदी भाषेचा सर्वाधिक वापर सातारा जिल्ह्यातील कºहाड शहरात होतो. त्यापाठोपाठ फलटण, सातारा आणि कोरेगाव या शहरांमध्ये हिंदी भाषेची चलती आहे. दैनंदिन व्यवहारांसाठी मराठी भाषिक हिंदी बोलतात तर हिंदी भाषिक मराठी बोलतात, अशी मजेशीर माहिती पुढे आली आहे.देशभरात १४ सप्टेंबर हा दिवस ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राष्ट्रीय भाषा म्हणून गौरविण्यात आलेल्या हिंदी भाषेचा सर्वाधिक वापर सातारा जिल्ह्यातील कºहाड शहरात होतो. त्यापाठोपाठ फलटण, सातारा आणि कोरेगाव या शहरांमध्ये हिंदी भाषेची चलती आहे. दैनंदिन व्यवहारांसाठी मराठी भाषिक हिंदी बोलतात तर हिंदी भाषिक मराठी बोलतात, अशी मजेशीर माहिती पुढे आली आहे.देशभरात १४ सप्टेंबर हा दिवस ‘हिंदी दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून शाळा महाविद्यालयांसह केंद्रीय कार्यालयांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर सातारकर आणि हिंंदी या विषयाचे सर्वेक्षण करण्यात आले.नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांत साताºयात स्थायिक झालेले अनेक हिंदी भाषिक अस्खलित मराठी बोलतात. हिंदीच्या अंदाजात त्यांचे मराठी उच्चार गमतीशीर वाटतात. स्त्रीलिंग, पुलिंग यांचा पुरेपूर गोंधळ त्यांच्या भाषेत असतो. हीच अवस्था मराठी भाषिकांची हिंदी बोलताना होते. ‘अरे वो तेरेको नही क्या दिया. तुम विसरे लगताय,’ ही आणि अशी अनेक वाक्य हिंदी आणि मराठी यांची सरमिसळ करणारी आहेत. हीच सातारी तºहेची हिंदी.बाजारपेठेत कपडे, सराफ, यांच्यासह किराणा मालाचा व्यापार करणारेही हिंदी भाषिक आहेत. रोज येणाºया ग्राहकांना त्यांच्या भाषेत संभाषण केल्याने आपुलकी वाटते, असं या लोकांचं म्हणणं आहे, म्हणूनच ते येणाºया ग्राहकांबरोबर मराठीत बोलतात. हातगाडीवर असणाºया व्यावसायिकांबरोबर तर हटकून सर्वजण हिंदीतच बोलतात. ‘ये कितनेकू दिया?’ हे वाक्य तर अगदी ठरलेलं. ग्रामीण भागातील अनेकजण मुंबईत माथाडी कामगार म्हणून कार्यरत असतात. गावाकडे यात्रा, लग्नकार्य, गणपती, दिवाळी या निमित्ताने येणाºया चाकरमान्यांची बंम्बईया हिंदीही धम्माल असते. ‘अरे साले तेरे को बोला वो समजता नई क्या?’ हे वाक्य मुंबईच्या हेलात साताºयात ऐकताना धम्माल मज्जा येते. कºहाड शहरात मुस्लीम समाजाबरोबरच जैन, मारवाडी समाजही मोठा आहे. त्यामुळे येथे हिंदी बोलणाºयांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ फलटण शहरात हिंदी भाषिकांची संख्याही मोठी आहे.