शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सन्मान देशसेवेचा... उपक्रम उंब्रजकरांचा; सेवानिवृत्त जवानाचे जंगी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:20 IST

उंब्रज : मिरवणुका अनेक निघतात. मात्र, उंब्रजकरांनी रविवारी रात्री पाहिली ती मिरवणूक काही वेगळीच होती. ही मिरवणूक म्हणजे एक सन्मान होता देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या शौर्याचा. हा सत्कार होता घरादाराचा त्याग करून देशासाठी दिलेल्या योगदानाचा. हा सन्मान होता उंब्रजकरांनी आपल्या भूमीतल्या जवानांप्रती दाखवलेल्या कृतज्ञतेचा!उंब्रजमधील जवान १८ वर्षे देशसेवा करून परत ...

उंब्रज : मिरवणुका अनेक निघतात. मात्र, उंब्रजकरांनी रविवारी रात्री पाहिली ती मिरवणूक काही वेगळीच होती. ही मिरवणूक म्हणजे एक सन्मान होता देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या शौर्याचा. हा सत्कार होता घरादाराचा त्याग करून देशासाठी दिलेल्या योगदानाचा. हा सन्मान होता उंब्रजकरांनी आपल्या भूमीतल्या जवानांप्रती दाखवलेल्या कृतज्ञतेचा!उंब्रजमधील जवान १८ वर्षे देशसेवा करून परत गावात आला. रस्त्यावरच त्याचे शेकडो ग्रामस्थांनी स्वागत केले. गाडीत बसवून वाजत-गाजत संपूर्ण गावातून मिरवणूक काढली आणि त्याचा सत्कार केला. अशी घटना जवानांच्या आयुष्यात दुर्मीळच. मात्र, हे घडवलं उब्रजकरांनी. सातारा जिल्हा हा स्वातंत्र्यसैनिकांचा म्हणून ओळखला जातोच. तसाच तो देशाच्या सीमेचे रक्षण करणाºया जवानांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. या जिल्ह्यातील हजारो युवक आजही देशसेवेत सीमेवर उभे ठाकलेले दिसून येतात. अशा पार्श्वभूमीवर असलेल्या या जिल्ह्याला सैनिकांविषयी आपुलकी व प्रेम आहेच. याच जिल्ह्यातील उंब्रजचा जवान सुनील जाधव हा अठरा वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त होऊन घरी येतोय, हे त्याच्या मित्रांना व ग्रामस्थांना समजले आणि या जवानाचे गावात जंगी स्वागत करून त्याची मिरवणूक काढून त्याचा सत्कार केला.रविवारी सायंकाळी येथील महामार्गावर जवान सुनील जाधव यांच्या मित्र परिवार व ग्रामस्थांनी गर्दी केली. दिमतीला बेंजो पथक, ओपन जीप तयार ठेवण्यात आली होती. सुनील जाधव यांनी उंब्रजमध्ये पाऊल ठेवले आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यांच्याबरोबरच सेवानिवृत्त झालेले त्याचे मित्र गडहिंग्लज गावचे अजय गोसावी हेही होते. या दोघांना ओपन जीपमध्ये बसवून त्यांची वाजतगाजत मिरवणूक सुरू झाली. मिरवणूक उपमार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. तेथे या दोन जवानांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दणाणून निघाला. त्यानंतर पुन्हा ही मिरवणूक बाजारपेठेतून ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराजवळ आली.