शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

‘होम मिनिस्टर’ प्रचारात!

By admin | Updated: October 7, 2014 22:44 IST

दक्षिणेच्या लढाईत रणरागिणी : पृथ्वीराजांसह अनेकांच्या अर्धांगिनी सक्रिय

प्रमोद सुकरे - कऱ्हाड - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ हॉट बनला आहे़ पृथ्वीराज चव्हाण, डॉ़ अतुल भोसले, आमदार विलासराव पाटील-उंडाळकर या तिरंगी लढतीकडे साऱ्यांचे लक्ष आहे़ सर्वच पक्षांच्या रडारवर कऱ्हाड आहे़ गडकरी, ठाकरे, तावडे, खोत, जानकर यांच्या तोफा येथे धडाडल्या आहेत़ पृथ्वीराज चव्हाणांची तोफ राज्यभर धडाडत आहे़ त्यामुळे त्यांच्या अर्धांगिनी सत्त्वशीला चव्हाण प्रचारात सक्रिय झाल्या आहेत़ विधानसभेची निवडणूक सध्या ऐतिहासिक वळणावर आहे़ युतीचे तुकडे अन आघाडीत बिघाडी झाल्याने चौरंगी, पंचरंगी लढती सर्वत्र पाहायला मिळत आहेत़ कऱ्हाड दक्षिणेत तर डझनभर उमेदवार रिंगणात आहेत़ राष्ट्रवादी वगळता सर्व पक्षांचे झेंडे मतदारसंघात फडकत आहेत़ युती-आघाडीचे राजकारण अवगत असणाऱ्या कार्यकर्त्यांची मात्र पंचाईत झाली आहे़ निवडणुकीच्या प्रचारात आता महिलाही आघाडीवर आहेत़ माजी ुमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्त्वशीला चव्हाण सध्या कऱ्हाडात तळ ठोकून आहेत़ दररोज तीन-चार गावांत पोहोचून महिलांच्या छोट्या बैठका घेऊन सुसंवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे़, तर त्यांच्या दोन स्नुषा आशा चव्हाण व गौरी चव्हाण (पुतण्यांच्या पत्नी) घरोघरी जाऊन महिलांना भेटून प्रचार करताहेत़ त्यांच्या सोबत कऱ्हाडच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, आर्चना पाटील, नगरसेविका स्मिता हुलवान अशी मान्यवर महिलांची टीम पाहायला मिळत आहे़ भाजपचे उमेदवार डॉ़ अतुल भोसले यांच्या मातोश्री उत्तरा भोसले व पत्नी गौैरवी भोसलेही प्रचारात सक्रिय झाल्या आहे़ कृष्णा उद्योग समूहातील विविध संस्थांमधील महिला पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन गावोगावी अन शहरातील प्रभागात जाऊन छोट्या-छोट्या बैठकांवरच त्यांचा भर आहे़ याउलट आमदार विलासराव पाटील-उंडाळकर मात्र ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत दिसत आहेत़ त्यांच्या कुटुंबातील कोणीही महिला प्रचारात दिसत नाही़ जिल्हा परिषद सदस्या सुरेखा पाटील, रोहिणी जंगम, वैजंता अडसूळ, पंचायत समिती सदस्या ललिता थोरात, सुषमा कोळेकर आदी महिला कार्यकर्त्या मात्र उंडाळकरांसाठी घराघरात जाऊन प्रचार करीत आहेत़ कऱ्हाड दक्षिणमध्ये यंदा मोठी चुरस निर्माण झाल्याने मातब्बर उमेदवारांच्या घरातील महिला प्रचारात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळतेय़ पतीच्या प्रचारासाठी अर्धांगिनी तर धावून येणारच, अशी चर्चा सुरू आहे़सासूबार्इंकडून बाळकडू सत्त्वशीला चव्हाण यांना त्यांच्या सासूबाई दिवंगत प्रेमलाताई चव्हाण यांच्याकडून प्रचाराचं बाळकडू मिळाल्याचं मानलं जातं़ इंदिरा काँग्रेसच्या स्थापनेनंतर पे्रमलाकाकींनी कऱ्हाडात घराघरात जाऊन महिलांना भेटून काँग्रेसच्या प्रवाहात आणले होते. डॉ़ अतुल भोसलेंसाठी प्रचारात उतरलेल्या गौरवी भोसलेंना तर माहेरकडूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे़ वडील आमदार दिलीप देशमुख व चुलते दिवंगत विलासराव देशमुख यांच्या तालमित त्या तयार झाल्यात म्हणे!एकमेव महिला उमेदवार कऱ्हाड दक्षिणेत प्रचारासाठी उमेदवारांच्या कुटुंबातील महिला अन कार्यकर्त्या महिला मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत़ पण या मतदारसंघातून अ‍ॅड़ विद्युल्लता मर्ढेकर या एकमेव महिला उमेदवार रिंगणात आहेत़ विशेष म्हणजे त्याही बाहेरून येऊन कऱ्हाडात उभ्या राहिल्या आहेत़