शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

साताऱ्यातील ऐतिहासिक विहिरी दुर्लक्षित!

By admin | Updated: April 23, 2016 00:42 IST

कचऱ्याचे साम्राज्य : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दुर्लक्षित विहिरींची निगा राखण्याची गरज

सातारा : साताऱ्यात शिवकालीन नैसर्गिक जलसाठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. काळाच्या ओघात या जलसाठ्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे शहरातील अनेक भागांत भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. शहराची मातृसंस्था असणाऱ्या पालिकेने या विहिरींची स्वच्छता मोहिम हाती घेऊन जलसाठे विकसित करावेत, अशी मागणी होत आहे.सातारा शहराच्या प्रत्येक भागात उपलब्ध विहिरींची संख्या पाहता त्या-त्या भागातील पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागू शकतो. पाण्याचे नियोजन व वापर याची सांगड घालणे गरजेचे आहे. पाणीसाठ्याचे जपणूक व जनत करणे महत्त्वाचे आहे. ‘जल है तो कल है’ हे जनतेला आता पटवून देण्याची वेळ आली आहे. पाणीबचतीचा नारा न देता तो कृतीततून सिद्ध करण्यासाठी लोकचळवळ उभारली पाहिजे.साताऱ्यात जलसाठे मुबलक आहेत; पण त्याचा वापर व उपभोग घेता येत नाही, अशी अवस्था शहरवासीयांची आहे. दुष्काळाने होरपळलेली जनता भटकंती करते आणि दुसरीकडे मुबलक पाणी आहे. पण त्याचा वापर नाही, हे विदारक चित्र साताऱ्यात आहे. सातारामधील नैसर्गिक जलसाठ्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे हे जिवंत पाण्याचे झरे भविष्यात मृत होतील यासाठी तरी या विहिरीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.पाण्यासाठी संपूर्ण राज्यातील जनता हैराण झाली आहे. हे चित्र पाहता जीवनात पाण्याचे मोल अनमोल असल्याचे दिसते. पाणी वाचविणे हे प्रत्येक नागरिकांनी स्वीकारले पाहिजे; तरच पाणीटंचाईवर मात करता येईल. भूगर्भातील जलसाठे ही खरी जीवनदायी आहे याची जाणीव ठेवून पाण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.सातारा शहरातील भूगर्भातील जलसाठे खोलवर गेले आहेत. भविष्यकाळात हे जनतेसाठी धोकादायक ठरू शकते. जलसाठ्याचे संवर्धन व निगा राखणे हे महत्त्वाचे आहे. शहराच्या अनेक भागांतील जलसाठे प्रशासनाने उन्हाळ्यापूर्वीच ताब्यात घेणे आवश्यक होते; परंतु साताऱ्यात मुबलक जलसाठा असून, केवळ नियोजनाचा अभावामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. उरमोडी, कास, धरणातील पाण्याच्या नियोजनावर विसंबून न राहता नैसर्गिक जलसाठ्याची निगा राखणे गरजेचे आहे.सातारा शहरात विशेषत: गडकर आळी, शुक्रवारपेठेच्या भागात जलसाठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. याचा वापर झाल्यास शहरात पाणीटंचाई भासणार नाही. पाण्याची उपसा होणे आवश्यक आहे; तरच पाणी स्वच्छ राहील. (प्रतिनिधी)जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार...थेंब-थेंब पाण्यासाठी जनतेला कोसो मैल धावपळ करावी लागत आहे. जेथे मुबलक जलसाठे आहेत. तेथे पाण्याचे महत्त्व उमजत नाही, अशीच स्थिती सातारामधील गडकर आळी, शुक्रवार पेठेतील आहे. अनंत इंग्लिश स्कूल ते बदामी विहीरपर्यंत जवळपास चारपेक्षा अधिक जुन्या काळातील दगडी बांधीव विहिरी आहेत. या विहिरींना ऐन उन्हाळ्यात ही भरपूर पाणी आहे; परंतु या विहिरीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. विहिरीत वाढलेल्या झाडे झुडपांमुळे या विहिरी असूनही त्याचा उपयोग घेता येत नाही. पाण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या जनतेच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखाच हा प्रकारशहरातील विहिरी एकेकाळी या परिसरातील नागरिकांसाठी जीवनदायी ठरत होत्या त्याचा वापरही मोठ्या प्रमाणात होत होता. कालांतराने शासनाच्या पाण्याच्या स्कीममुळे घराघरांमध्ये जलवाहिनी पोहोचली आणि या विहिरींकडे दुर्लक्ष होत गेले जलसाठे असूनही त्याचे मोल समजत नाही, हे दुर्दैव आहे. - श्रीरंग काटेकर, सामाजिक कार्यकर्ते, सातारा आहे.