शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

ऐतिहासिक वस्तूंच्या स्पर्शानं सातारकर पुलकित !

By admin | Updated: May 19, 2015 00:31 IST

वस्त्र, शस्त्र, चित्र, शिल्प : साताऱ्यात पहिला जागतिक संग्रहालय दिवस उत्साहात साजरा

सातारा : येथील छ. शिवाजी महाराज संग्रहालय ऐतिहासिक वस्तूंनी संपन्न आहे. सोमवारी नागरिकांनी या संग्रहालयास भेट देऊन तेथील ऐतिहासिक वस्तू जवळून पाहण्याबरोबरच त्यांना स्पर्शही केला. इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या वस्तूंच्या स्पर्शाने पुलकित होण्याचा अनुभव सातारकरांनी घेतला. निमित्त होतं जागतिक वस्तुसंग्रहालय दिवसाचं.येथील छ. शिवाजी महाराज संग्रहालय व जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यात पहिला जागतिक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सातारकरांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास माजी संग्रहालय अभिरक्षक प. ना. पोतदार, भास्कर मेहेंदळे, चित्रकक्ष सहायक हेमा द्रविड, विक्रांत मंडपे, जयश्री चौकवाले आदी उपस्थित होते.संग्रहालय दिवसानिमित्त सोमवारी नि:शुल्क प्रवेश देण्यात आला. इतिहासप्रेमी, नागरिकांनी मोठ्या संख्येने संग्रहालयास भेट देऊन विविध दालनातील वस्तू पाहिल्या. संग्रहालयात वस्त्र, शस्त्र, चित्र व शिल्प असे विभाग असून नागरिकांना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. चिकित्सक नागरिकांनी आपल्या ऐतिहासिक वारशाबद्दल माहिती घेतली. प. ना. पोतदार यांनी शिवाजी महाराज संग्रहालयाची उभारणी कशी झाली, याबाबत माहिती दिली. संग्रहालयाची गरज व अडचणी याविषयी हेमा द्रविड यांनी मार्गदर्शन केले. साताऱ्यात हा दिवस साजरा व्हावा, यासाठी जिज्ञासाच्या वतीने केलेल्या प्रयत्नांना पुरातत्व विभागाचे संचालक संजय पाटील व संग्रहालय विभागाने सकारात्मक पाठिंबा दिल्याने येथील छ. शिवाजी महाराज संग्रहालयात सोमवारी हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जयश्री चौकवाले यांनी प्रास्ताविक केले. नितीन पवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)