शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात दोन वर्षांतील उच्चांकी तापमान; ४१.६ अंशांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 23:39 IST

सातारा : सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात सूर्यनारायण तळपू लागल्याने कमाल तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी तर सातारा शहरातील तापमान ४१.६ ...

सातारा : सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात सूर्यनारायण तळपू लागल्याने कमाल तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी तर सातारा शहरातील तापमान ४१.६ अंशांवर पोहोचले होते. दोन वर्षांतील हे उच्चांकी तापमान ठरले आहे. त्याचबरोबर पूर्व भागात तर तापमाने ४२ अंशांचा टप्पा केव्हाच पार केला आहे.मार्च महिन्यापासून सातारा जिल्ह्यात कमाल तापमान वाढू लागले. मार्चच्या मध्यापर्यंत तापमान ३५ अंशांच्या दरम्यान होते. मात्र, त्यानंतर तापमानात हळूहळू वाढ होत गेली. तर एप्रिल महिन्यात सतत कमाल तापमान ३८ अंशांच्या पुढेच राहिले. ४ एप्रिलला २०१९ या वर्षातील सर्वात अधिक तापमान साताºयात नोंदले गेले व प्रथमच ४० अंशांचा टप्पाही पार केला. या दिवशी ४०.३ अंश तापमान होते. त्याचवेळी या वर्षातील उन्हाळा अधिक तीव्र असणार हे स्पष्ट झाले. तर त्यानंतर ११ एप्रिलला ४.६ अंश तापमान नोंदले गेले.एप्रिल महिन्यात आतापर्यंतच्या २६ दिवसांत ७ वेळा कमाल तापमानाने ४० अंशांचा टप्पा पार केला. तर शुक्रवारचे तापमान दोन वर्षांतील उच्चांकी ठरले. सातारा शहरात ४१.६ अंश तापमानाची नोंद झाली. तसेच दुसरीकडे किमान तापमानातही वाढ होत असल्याने दिवसा तसेच रात्रीही उकाडा जाणवत आहे.दरम्यान, सूर्य आग ओकू लागल्याने दुपारच्या सुमारास रस्त्यावरही तुरळक वाहने दिसत असतात. तसेच बाजारपेठेतही नागरिकांची फारशी वर्दळ नसते. नागरिक घरात थांबणेच पसंद करतात तर अनेकजण झाडाची सावली, बागांमध्ये आसरा घेताना दिसत आहेत.माण, खटावमध्येतीव्र झळा...सातारा शहरात तापमानाची नोंद होते. त्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद ही पूर्व भागातील माण, खटाव तालुक्यांत होते. साताºयात शुक्रवारी ४१.६ अंश तापमान नोंद झाले असलेतरी या दोन तालुक्यांतील तापमानाने ४२ अंशांचा टप्पा केव्हाच पार केलाय. या तालुक्यात तर दूरदूर झाडे नसतात. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा लागतात.दिनांक किमान कमालतापमान तापमान२० एप्रिल १८.८ ३७.४२१ एप्रिल २०.६ ३७.४२२ एप्रिल २०.८ ३८.७२३ एप्रिल २२.७ ४०.१२४ एप्रिल २५.२ ४०.६२५ एप्रिल २६ ४०.४२६ एप्रिल २६.८ ४१.६