शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

कार्यालयातून चार हजार मावळ्यांशी ‘हायटेक संपर्क’ !

By admin | Updated: September 23, 2016 00:44 IST

सातारा मराठा क्रांती मोर्चा : संगणकाद्वारे मिळतात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना नियोजनबद्ध संदेश

सातारा : महाराष्ट्रभर अत्यंत शांततेच्या मार्गाने मराठा समाजाचे विराट मोर्चे निघत आहेत. नेता विरहित या मोर्चांना प्रतिसाद मिळतो कसा?, असा प्रश्न अनेकदा पुढे येत आहे. विराट गर्दीला एकत्रित करायचे तर त्याला मायक्रो प्लॅनिंग पाहिजे. हेच प्लॅनिंग अत्यंत सजगपणे होताना दिसतेय. साताऱ्यातील एसटी महामंडळाच्या नूतन इमारतीमधील संपर्क कार्यालयामधून प्लॅनिंगची सूत्रे नियोजनबद्धरीत्या हालत असतात. लोकसभा, विधानसभा निवडणुकांमधील ‘स्पेशल रूम’प्रमाणे प्रयोग एखाद्या मोर्चाच्या निमित्ताने पहिल्यांदाच केला गेल्याचे पाहायला मिळते. साताऱ्यात एसटी विभागीय कार्यालयाचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. या इमारतीमधील एका मोठ्या गाळ्यात मराठा क्रांती मोर्चाचे संपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयातूनच दि. ३ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मोर्चाच्या अनुषंगाने नियोजन बैठकांची सूत्रे हालतात. याच कार्यालयाच्या मागच्या बाजूला आणखी छोटी रूम आहे. यामध्ये एका टेबलावर संगणक ठेवण्यात आला आहे. या संगणकाला ई-मेलची व्यवस्था जोडण्यात आलेली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात गावोगावी बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांचे नियोजन ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्वयंसेवक करत आहेत. प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या बैठकांचे सूक्ष्म नियोजन आहे. गावात झालेल्या बैठकांची माहिती संपर्क कार्यालयापर्यंत पोहोचविली जाते. त्यानंतर इथूनच नियोजनाच्या अनुषंगाने ‘ईमेल, व्हॉट्सअ‍ॅप, टेक्स्ट मेसेज’ यांच्या माध्यमातून स्वयंसेवकांपर्यंत माहिती पुरविली जाते. अजून काही दिवस बाकी असल्याने युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. (प्रतिनिधी) जिल्ह्यात ४ हजार स्वयंसेवक..मराठा क्रांती मोर्चाचे सातारा जिल्ह्यात ४ हजार स्वयंसेवक आहेत. यांनी स्वत:हून कामाच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत. सर्वच स्वयंसेवकांकडे स्मार्ट फोन असल्याने संपर्क कार्यालयामधील संगणकातून पाठविलेला ‘मेसेज’ एकाच वेळी जिल्ह्यात स्वयंसेवकांना मिळतो. सारं काही नियोजनबद्ध!राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाने लाखोंच्या गर्दीने मोर्चे काढले. या मोर्चांतील स्वयंशिस्त महत्त्वाची ठरली. इतक्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर आल्यानंतर कायदा-सुव्यवस्थेचा बिलकूल प्रश्न निर्माण होऊ न देता स्वयंशिस्तीमुळे हे मोर्चे अत्यंत शांततेत पार पडले.