तळमावले : कुंभारगाव (ता. पाटण) येथील जाणता राजा युवाशक्ती सेवाभावी संस्थेने ढेबेवाडी आणि काळगाव विभागातील पूरग्रस्त, भूस्खलन, दरडग्रस्त बाधितांना धान्य, किराणा, कपडे, औषधे, लहान मुलांना खाऊ तसेच शालोपयोगी साहित्याचे वाटप केले.
माजी उपसभापती रमेश मोरे, सुनील चाळके, विक्रम वरेकर, अमृत चाळके, महेश वरेकर, संदीप वरेकर, सुरेश टोळे, प्रमोद मोरे, दादासाहेब यादव, सागर मोरे, वैभव नलगे, प्रकाश यादव, निवास मोरे, उत्तम माटेकर, रवींद्र माटेकर, दादासो मोरे, सुदाम चव्हाण, विकास भरत मोरे, राजू चव्हाण, आत्माराम मोरे आदी उपस्थित होते.
धनावडेवाडी, शिंदेवाडी, भातडेवाडी, धनगरवाडी, गुरव आवाड, जितकरवाडी, सातर, जोशीवाडी, काळगाव येथील ग्रामस्थांना ही मदत करण्यात आली. येथील ग्रामस्थांच्या व्यथा संस्थेने जाणून घेतल्या. त्यापैकी जोशीवाडी या गावची अवस्था फार बिकट आहे. सुमारे एक किलोमीटरपर्यंत जमिनीला भेगा पडलेल्या असून, काही ठिकाणी सहा ते सात फूट भूस्खलन झाले आहे. काही रस्ते वाहून गेले आहेत. येथील ग्रामस्थांनी पुनर्वसन करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.